डायबिटीसच्या रुग्णांनी 'या' चूका केल्यास मृत्यूला सामोरे जावे लागे, कधीही करु नका या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 12:52 PM2021-09-19T12:52:59+5:302021-09-19T12:53:44+5:30

आजकाल लोकांची जीवनशैली जशी बनली आहे, डायबिटीसचा धोका सतत वाढत आहे. चला तर मग, डायबिटीसच्या रुग्णांनी कोणत्या चुका करू नयेत ते जाणून घेऊया.

habits diabetes patient should follow mistakes diabetes patient should avoid | डायबिटीसच्या रुग्णांनी 'या' चूका केल्यास मृत्यूला सामोरे जावे लागे, कधीही करु नका या गोष्टी

डायबिटीसच्या रुग्णांनी 'या' चूका केल्यास मृत्यूला सामोरे जावे लागे, कधीही करु नका या गोष्टी

googlenewsNext

डायबिटीस रुग्णांना साखरेची पातळी वाढण्याची भीती नेहमीच असते. या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना भरपूर खाद्यपदार्थ टाळावे लागतात. जर हे पथ्य पाळले नाही तर साखरेची पातळी वाढु शकते, जे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.

म्हणूनच साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी, डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ डायबिटीस रुग्णांना सकस आहार, व्यायाम करण्याचा आणि चांगली झोप घेण्याचा सल्ला देतात. यासह, या रुग्णांना तणावापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आजकाल लोकांची जीवनशैली जशी बनली आहे, डायबिटीसचा धोका सतत वाढत आहे. चला तर मग, डायबिटीसच्या रुग्णांनी कोणत्या चुका करू नयेत ते जाणून घेऊया.

भरपूर फळे खाणे
फळांचे सेवन प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. सामान्यतः लोकांचा असा विश्वास आहे की मधुमेहाच्या रुग्णांनी फळे खाऊ नयेत, तर तसे नाही. त्यांना फक्त योग्य फळे निवडायची आहेत आणि त्याच वेळी त्यांच्या प्रमाणाची काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही जास्त प्रमाणात फळं खाल्लीत तर साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे फळांचे योग्य प्रमाणातच सेवन करा.

व्यायाम न करणे
चुकीची जीवनशैली केवळ रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करत नाही तर यामुळे लठ्ठपणा आणि विविध आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. म्हणूनच आपली जीवनशैली सुधारणे महत्वाचे आहे. दररोज व्यायाम करा, योगा करा आणि हे देखील लक्षात ठेवा की या रुग्णांनी नेहमीपेक्षा अधिक व्यायाम करायला विसरू नका.

खाण्याच्या वेळांमध्ये जास्त अंतर
बऱ्याचदा अनेकांना अशी सवय असते की सकाळी ९ वाजता नाश्ता केला तर थेट २-३ वाजता जेवण करतात. मधुमेही रुग्णांनी हे अजिबात करू नये. वास्तविक, प्रत्येक जेवणात जास्त अंतर ठेवल्याने साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात की एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी एका वेळी कमी प्रमाणात खा आणि दोन खाण्यांमध्ये कमी अंतर ठेवा.

डायबिटीसमध्ये 'ही' खबरदारी आवश्यक आहे
-जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाऊ नका.
- सकाळी नाश्ता करायला विसरू नका.
- रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.
- दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या.
- तळलेले पदार्थ किंवा फास्ट फूड खाणे टाळा.

Web Title: habits diabetes patient should follow mistakes diabetes patient should avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.