Global Hand washing Day : हात धुण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ आवर्जून द्या, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 13:51 IST2018-10-15T13:36:17+5:302018-10-15T13:51:00+5:30
Global Hand washing Day : तुम्हाला माहिती आहे का?, हात धुण्यासाठी एक निश्चित कालावधी असून हात धुण्याची विशेष पद्धतदेखील आहे.

Global Hand washing Day : हात धुण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ आवर्जून द्या, कारण...
15 ऑक्टोबर हा दिवस 'ग्लोबल हँड वॉशिंग डे 'म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला माहिती आहे का?, हात धुण्यासाठी एक निश्चित कालावधी असून याची विशेष पद्धतदेखील आहे. यानुसार हात धुवाल तर आजार, संसर्गापासून तुम्ही नक्की दूर राहाल. चला जाणून घेऊन हात धुण्याची ही विशेष पद्धत...
असे धुवा हात, रोगांवर करा मात
सुरुवातीला हात स्वच्छ आणि कोमट पाण्यानं ओले करा. यानंतर साबण लावून हात 20 सेकंदांपर्यंत व्यवस्थित एकमेकांवर चोळा. या प्रक्रियेत हातांसहीत तळवे, हाताचा मागील भाग, बोटे आणि नखेदेखील स्वच्छ झाली पाहिजेत. यानंतर हात पाण्यानं स्वच्छ करा, एका कापडानं हात पुसून घ्याव. हात पुसण्यासाठी स्वतःच्याच रुमाल किंवा टॉवेलचा वापर करावा, हे लक्षात असू द्यावेत.
(World Handwash Day : अनेक गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीने धुवा हात!)
हात कधी धुवावेत?
- जेवण बनवताना, जेवताना आणि जेवण वाढताना आणि यापूर्वी हात धुवून घ्यावेत
- शौचास जाऊन आल्यानंतर हात धुणे आवश्यक
- शिंकल्यानंतर हात धुवावेत
- आपल्या बाळाचे नाक स्वच्छ केल्यानंतर हात धुणे गरजेचं
- शौचास गेल्यानंतर किंवा डायपर बदल्यानंतर
- शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतरही हात धुणे महत्त्वाचे
- पाळीव प्राण्यांसोबत खेळल्यानंतर हात जरूर धुवावेत
- आजारी व्यक्तीच्या भेटीनंतर
हात धुण्यासाठीचे अन्य पर्याय
हात धुण्यासाठी जर पाणीच नसेल तर बाजारात अशी कित्येक उत्पादनं हात धुण्यासाठी पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. या उत्पादनांचा तुम्ही हात स्वच्छ करण्यासाठी वापर करू शकता. यामध्ये हँड सॅनिटायझर,वाइप्स आणि विशेष प्रकारचे टिशू पेपर्सचा समावेश आहे.
निष्काळजीपणा टाळा
हात धुण्यासाठी केवळ काही सेकंद योग्य पद्धतीनं दिल्यास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना डॉक्टरांकडे खेटे मारण्याची गरज भासणार नाही. स्वच्छ आणि योग्यरित्या हात धुतल्यास आजारपण, संसर्ग, इत्यादी रोगराईपासून तुम्हाला मुक्तता मिळेल.