Glenmark launch fabiflu tablets with 400mg patients have to take 9 pills on day 1 covid 19 treatment | कोरोनावर मात करण्यासाठी ग्लेनमार्क लॉन्च करणार 'फेबिफ्लू'; पहिले ९ दिवस घ्यावी लागणार औषधं

कोरोनावर मात करण्यासाठी ग्लेनमार्क लॉन्च करणार 'फेबिफ्लू'; पहिले ९ दिवस घ्यावी लागणार औषधं

भारतीय औषधं तयार करणारी कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स (Glenmark Pharmaceuticals) कोरोना विषाणूंच्या उपचारात वापरात असलेले फेबिफ्लू हे औषध बाजारात आणणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही टॅबलेट ४०० मिलीग्राम असेल. या औषधाचा वापर कोविड १९ ची सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर केला जातो. या औषधाच्या स्वरूपात कमी गोळ्यामध्ये पूर्ण डोस उपलब्ध होणार आहे. 

कोरोना रुग्णांना पहिल्या दिवसापासून दोनवेळा या गोळ्याचे सेवन कराचे आहे. कोर्स पूर्ण होईपर्यंत  २-२ टॅबलेट घ्याव्या लागणार आहेत. डीजीसीआयकडून हे औषध लॉन्च करण्यासाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सना परवागनी मिळाली आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने कोरोना व्हायरसची सौम्य लक्षणं दिसत असलेल्या रुग्णाच्या उपचारांसाठी फेविपिराविरला फेबिफ्लू नावानं तयार केलं होतं. मुंबईच्या या कंपनीला डीजीसीआयने निर्मीती आणि विपणनाची परवागनी दिली आहे.  

या कंपनीच्या वैद्यकिय विकास विभागाच्या प्रमुख मोनिका टंडन यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने आता रिसर्च आणि डेवलपमेंट प्रोगामअंतर्गत ४०० mg टॅबलेट तयार केली आहे. या औषधाचे परिणाम सकारात्मक दिसून आले आहेत. हे औषध लॉन्च केल्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. बुधवारच्या तुलनेत २.८३ टक्क्यांनी वर आहे.

दरम्यान सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजनी मंगळवारी फ्लूगार्ड ही टॅबलेट लॉन्च केली आहे.  भारतीय बाजारात या टॅबलेटची किंमत ३५ रुपये इतकी आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड१९ ची सौम्य लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांना ही औषधं दिली जाणार आहेत. हे औषध फेविपिराविरचे वर्जन आहे. फेविपरिविर हे एक मात्र असं औषध आहे. ज्या औषधाला भारतात एंटी व्हायरल ट्रिटमेंटसाठी कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. फ्लूगार्ड टॅबलेटमध्ये २०० एमजीचा डोस आहे. हे औषध स्वस्त असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचू शकते. 

खरंच तुमच्या मास्कने कोरोना संसर्गापासून होतोय बचाव? घरच्याघरी 'ही' ट्रिक वापरून तपासा

आनंदाची बातमी! भारतात लॉन्च झालं कोरोनाचं औषधं 'कोविहॉल्ट'; ४९ रुपयांत रुग्णांसाठी उपलब्ध होणार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Glenmark launch fabiflu tablets with 400mg patients have to take 9 pills on day 1 covid 19 treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.