जांभळं खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय टाळावे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 09:48 AM2024-06-22T09:48:10+5:302024-06-22T09:48:39+5:30

Black Plum : जांभळांसोबत काही खास पदार्थ खाल्ल्यास गंभीर समस्या होण्याचा धोकाही असतो.

Foods to avoid after eating jamun fruit or black pulm | जांभळं खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय टाळावे!

जांभळं खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय टाळावे!

Black Plum : नुकतीच पावसाला सुरू झाली आणि बाजारात फळ विकणाऱ्यांच्या गाड्यांवर जांभळं दिलू लागली. या दिवसात लोक खूप आवडीने आंबट-गोड जांभळं खातात. जांभळांचं सेवन आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. पण जांभळं खाताना काही गोष्टींची काळजी घेणंही महत्वाचं आहे. जांभळांसोबत काही खास पदार्थ खाल्ल्यास गंभीर समस्या होण्याचा धोकाही असतो. न्यूट्रिशनिस्ट पूजा पलरीवाला यांनी जांभळाचे फायदे सांगणारा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे.

जांभळामधील पोषक तत्व

जांभळांमध्ये अनेक फायदेशीर पोषक तत्व असतात. जे आरोग्यासाठी फार महत्वाचे असतात. या फळामधून शरीराला भरपूर आयर्न, कॅल्शिअम, फॉस्फोरस, सोडिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी मिळतात.

पाणी पिणं टाळा

जांभळं खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. यामुळे तुम्हाला जुलाब किंवा उलटीची समस्या होऊ शकते. तसेच पोटासंबंधी काही समस्याही होऊ शकतात. जांभळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचन चांगलं होत नाही त्याशिवाय आतड्यांवर सूजही येऊ शकते. कधीही जांभळं खाल्ल्यावर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे.

ब्लड शुगर कंट्रोल

सगळ्यांनी जांभळं खाल्ले पाहिजेत कारण याच्या माध्यमातून ब्लड शुगर, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. तसेच याने दातांची स्वच्छता होते. हिरड्यांमधून येणारं रक्तही याने थांबतं. त्यासोबतच याने वजन कमी करण्यास मदत मिळते. पण या फळासोबत खालील तीन पदार्थ खाऊ नये.

हळद आणि जांभळं

यात जराही शंका नाही की, हळद एक आयुर्वेदिक औषधी आहे. जी आपल्या शरीराला अनेक फायदे देते. पण हळद जांभळांसोबत कधीच खाऊ नये. कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांवर रिअॅक्ट करतात. ज्यामुळे पोटदुखी, मळमळ आणि अॅलर्जी होण्याचा धोका राहतो.

जांभळं आणि दूध

जांभळं कधीही दूध किंवा दुधापासून तयार पदार्थांसोबत खाऊ नये. कारण असं केल्याने पोटात गडबड होऊ शकते. असं केलं तर जास्त शक्यता आहे की, तुम्हाला अपचन, गॅस, पोटदुखीची समस्या होऊ शकते. 

लोणचं आणि जांभळं

जास्तीत जास्त डायटिशिअन लोणच्याला हेल्दी मानत नाहीत. यापासून शरीराला काहीच फायदे मिळत नसल्याचं ते सांगतात. जर जांभळं खाण्याआधी किंवा नंतर तुम्ही लोणचं खाल्लं तर तुम्हील उलटी, गॅस आणि मळमळ होण्याची समस्या होऊ शकते.

Web Title: Foods to avoid after eating jamun fruit or black pulm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.