शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' 6 पदार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 11:34 IST

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यूएचओनुसार, दरवर्षी जवळपास 3 मिलियन लोकं श्वसना संबंधी आजारांनी पीडित होतात. दूषित हवा आणि धकाधकीचा दिनक्रम तुमच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यूएचओनुसार, दरवर्षी जवळपास 3 मिलियन लोकं श्वसना संबंधी आजारांनी पीडित होतात. दूषित हवा आणि धकाधकीचा दिनक्रम तुमच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो. त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यस त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे श्वसनासंदर्भातील विकारही होउ शकतात. डॉक्टर आणि तज्ज्ञांनुसार, योग्य आहार आणि जीवनशैली यांमुळे तुम्हाला फुफ्फुसांचं आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते. 

1.  लसूण

लसणामध्ये असलेली एलिसिन आणि फायटोन्यूट्रिएंट यांसारखी तत्वे आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. यामध्ये अॅन्टीमायक्रोबायल, अॅन्टी-कॅन्सर आणि ब्लड प्रेशर कमी करणारे गुमधर्म असतात. चीनमधील वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान असं आढळून आलं की, लसूण फुफ्फुसांचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच फुफ्फुसांचा कॅन्सर असणाऱ्या व्यक्तींनाही याचा फायदा होतो. 

2. पालक 

पालक व्हिटॅमिन आणि खनिज तत्वांचा भंडार आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. वैज्ञानिकांना असं आढळलं की, पालकामध्ये असलेलं फोयटोकेमिकल्स शरीरातील सूज कमी करण्याचं आणि कॅन्सरशी लढण्यासाठी मदत करतात. दररोज एक कप पालक खाल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 

3. सफरचंद

सफरचंदामध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि फायटोकेमकल्स (कॅटेचिन, क्लोरोजेनिक अॅसिड आणि फ्लोरिडजिन) मुबलक प्रमाणात आढळून येतात. यामुळे अस्थमा, कॅन्सर, शरीरातील सूज आणि हृदयाचे विकार यांवर फायदेशीर ठरतात. नाश्त्यामध्ये दररोज एक सफरचंद खाल्याने फुफ्फुसांचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. 

4. आले

सर्दी आणि गळ्याच्या तक्रारींवर उपायकारक ठरणारे आले, फुफ्फुसांचं आरोग्य रखण्यासही फायदेशीर असतं. संशोधकांना संशोधनादरम्यान असं आढळलं की, यामध्ये बायोअॅक्टीव्ह यौगिक आणि जिंजरोल असतं. आल्यातून येणाऱ्या गंधाचं कारणही त्यातील जिंजरोल हेच असतं. जिंजरोल अस्थमा, सर्दी, मायग्रेन आणि उच्च रक्तदाब थांबवण्यास मदत करतो. दररोज आल्याच पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. 

5. ब्रोकली

ब्रोकलीमधील तत्व आरोग्यसाठी लाभदायी असतात. वैज्ञानिकांनुसार, ब्रोकलीमध्ये सल्फोराफेन (एसएफएन) नावाचं तत्व मुबलक प्रमाणात आढळून येतं. ज्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, अॅन्टी-इफ्लेमेटरी, अॅन्टी-कॅन्सर आणि अॅन्टीमिक्राबियल गुण असतात. फुफ्फुसं, पोट आणि स्तनाच्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे दररोज अर्धा कप ब्रोकलीचं सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. 

6. हळद

हळदीचा उपयोग विविध शरीराच्या व्याधी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. हळदीमध्ये  करक्यूमिन नावाचं तत्व मुबलक प्रमाणात असून त्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, अॅन्टी-इंफ्लेमेटरी, अॅन्टी-कॅन्सर आणि अॅन्टीमिक्राबियल गुणधर्म असतात. यामुळे कॅन्सर आणि लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी मदत होते. सकाळच्या वेळी हळदीचा छोटासा तुकडा खाणं शरीराच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य