तुम्ही हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवता का? ठेवत असाल तर वेळीच व्हा सावध...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:17 IST2019-11-27T16:04:17+5:302019-11-27T16:17:27+5:30
तुम्ही सुध्दा हे पदार्थ फ्रिज मध्ये ठेवत असाल तर, आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

तुम्ही हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवता का? ठेवत असाल तर वेळीच व्हा सावध...
तुम्ही सुध्दा हे पदार्थ फ्रिज मध्ये ठेवत असाल तर, आरोग्यासाठी घातक ठरू शकते. काही स्वयंपाक घरात लागणारया गोष्टी या फ्रिजमध्ये ठेवण्यापेक्षा बाहेर ठेवलेले चांगलं असतं. काही पदार्थ असे असतात जे फ्रिजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते. परंतु तरीही आपण फ्रिजमध्ये ठेवतो. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत. जे फ्रीजमध्ये ठेवल्यास खराब होतात.
सफरचंद
सफरचंद फ्रिजमध्ये योग्य पध्दतीने ठेवले नाही तर लवकर खराब होऊ शकतात. हे फळ फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास कागदात गुंडाळून भाज्या ठेवण्यासाठी असलेल्या खालच्या भागातच ठेवावे. बिया असणारे फळही फ्रिजमध्ये ठेऊ नये. कमी तापमनामुळे हे फळ लवकर पिकतं आणि खराब होऊ शकतं.
आलं
आलं खूप वेळ फ्रीजमध्ये ठेवले असेल, तर ते कापल्यावर अनेकदा त्यावर डाग पडल्याचे दिसून येते आणि कुबट वास येतो. फ्रीजमध्ये आले ठेवल्यास त्याच्या बाहेरच्या सालीवर काहीही परिणाम होत नाही. त्यापेक्षा आलं बाहेर ठेवल्यास खराब होणार नाही.
ब्रेड
फ्रीज ब्रेडमधली आर्द्रता (moisture) शोषून घेते, ज्यामुळे ब्रेड वेळे आधीच शिळा होऊ शकतो. त्यामुळे ब्रेड ठेवायचाच झाल्यास तो प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळून ठेवावा. अन्यथा ब्रेड खराब होण्याची शक्यता असते.
मध
मध फ्रीजमध्ये ठेवल्यास साखरेच्या स्फटिकांची प्रक्रिया जोरात सुरु होते. आणि त्यामुळे मधावर थर जमा होतो. त्याची चव बदलते. अनेकदा मुंग्या लागु नये.म्हणून मध हे फ्रिजमध्ये ठेवलं जात, याला पर्याय म्हणून मधाच्या बाटलीत लवंग घातल्यास मुंग्या लागणार नाहीत.
बटाटा-
फ्रीजचे तापमान अतिशय कमी असेल आणि त्यात बटाटे ठेवले गेले असतील तर बटाट्याची मूळ चव बिघडते. तसेच सालीवर देखील डाग निर्माण होतात. त्यामुळे जर बटाटे फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ती प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घालून किंवा डब्ब्यात मगच फ्रीजमध्ये ठेवावीत.
कॉफी
कॉफीला हवाबंद डब्यामध्ये ठेवा. फ्रिजमध्ये कॉफी ठेवल्यास ती घट्ट होते आणि वाया जाते.
कांदा, लसूण
कांदा आणि लसणाला कधीच फ्रिजमध्ये ठेऊ नका. कारण लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याला अंकुर फुटते आणि त्याची चव कमी होते. लसणाला नेहमी सुर्यप्रकाशापासून दूर ठेवा.