शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

चालत-धावत असालच पण जास्त फायदेशीर काय आहे? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 13:31 IST

Walking or Running which one is Best: बऱ्याच लोकांना रोज चालण्याची सवय असते तर काही लोक धावायला जातात. पण या दोन्हींपैकी सगळ्यात फायदेशीर काय हे माहीत आहे का? चला जाणून घेऊ.

Walking or Running which one is Best: शरीर फीट ठेवण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेची असते एक्सरसाइज, चांगली लाइफस्टाईल, हेल्दी डाएट यामुळे शरीर निरोगी राहतं. शारीरिक दृष्टीने फीट राहण्यासाठी एक्सरसाइज फार महत्वाची असते. सगळ्यात सोपी एक्सरसाइज आहे चालणं किंवा धावणं. बऱ्याच लोकांना रोज चालण्याची सवय असते तर काही लोक धावायला जातात. पण या दोन्हींपैकी सगळ्यात फायदेशीर काय हे माहीत आहे का? चला जाणून घेऊ.

हेल्थवर अवलंबून

चालण किंवा फिरणं दोन्हीही तुमच्या हेल्थवर अवलंबून असतं. तशा या दोन्ही ॲक्टिविटी फार चांगल्या असतात. वॉकिंग आणि रनिंगमधून एक निवडण्यासाठी तुम्हाला तुमची हेल्थ बघावी लागेल. 

रिसर्च काय सांगतो ? 

मेडिसिन आणि सायन्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एक सर्व्हे साधारण 6 वर्षे करण्यात आला. ज्यात रनिंग करणाऱ्या 30 हजार लोकांसोबत आणि वॉकिंग करणाऱ्या 15 हजार लोकांसोबत चर्चा करून डेटा एकत्र करण्यात आला. यातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, या दोनपैकी कोणत्याही गटाने जास्तीत जास्त वजन कमी केलं आणि कुणी वजन कायम ठेवलं.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, वॉकिंग आणि रनिंग दोन्ही गटाने दर आठवड्यात बरोबरीत कॅलरी बर्न केल्यात. पण रनिंग करणाऱ्या गटामध्ये असेही लोक होते, जे त्यांचं वजन कंट्रोल करण्यात आणि जास्त काळासाठी कामय ठेवण्यात यशस्वी ठरले. 

वर्कआउटनंतरही कॅलरी बर्न होतात

असं यासाठी कारण high intensity एक्सरसाइजचे परिणाम नॉर्मल वर्कआउटच्या तुलनेत जास्त आणि दीर्घ काळासाठी बघायला मिळतात. high intensity एक्सरसाइज किंवा वर्कआउटच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही आरामाच्या मुद्रेत असता त्यावेळी सुद्धा कॅलरी बर्न होत राहतात. कारण फार जास्त तीव्रता असलेल्या एक्सरसाइज दरम्यान तुमचा मेटाबॉलिज्म रेट वाढतो आणि एक्सरसाइज करण्याच्या 14 तासांनंतरही शरीरातील कॅलरी बर्न होत राहतात.  

जे जमेल ते करा

यातून हे स्पष्ट झालं आहे की, वजन कमी करण्यासाठी वॉकिंगपेक्षा रनिंग अधिक फायदेशीर असते. पण तरी सुद्धा जर तुम्हाला वॉकिंग जास्त पसंत असेल तर तुम्ही वॉकिंग करायला हवं. कारण अनेक रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, व्यक्तीला जी गोष्ट पसंत असते ती तो नियमित करू शकतो. त्यामुळे जे आवडतं ते करावं.  

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य