Fitness : रणबीर कपूरचा 'हा' आहे फिटनेस मंत्रा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 12:16 IST2017-07-21T06:46:07+5:302017-07-21T12:16:07+5:30
स्मार्ट आणि फिट दिसण्यासाठी रणबीर कपूरची डेली रुटीन जाणून घ्या !
.jpg)
Fitness : रणबीर कपूरचा 'हा' आहे फिटनेस मंत्रा !
प रत्येक सेलिब्रिटीला फिट असणे आवश्यक असते. त्याशिवाय चित्रपटातील आपल्या भूमिकेला ते न्याय देऊच शकत नाही. यासाठी प्रत्येक सेलेब्स रात्रंदिवस जिममध्ये खूपच मेहनत घेतात. जिमबरोबरच त्यांचा डायट प्लॅनही अतिशय महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे त्यांचा डायट प्लॅन ठरलेलाच असतो. ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून त्यातील हिरो रणबीर कपूर दिसायला खूपच स्मार्ट आणि फिट आहे. रणबीरने आपला लूक खूपच मेंटेन केला असून त्याने नुकत्याच विविध मॅगझिन्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे. रणबीर कपूर हा एका पंजाबी कुटूंबातील असून त्याला विविध प्रकारच्या डिशेस खाणे आवडते. विशेष म्हणजे रणबीर स्ट्रॉँग बॉडी बनविण्यासाठी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचे सेवन करतो. तसेच हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी कार्डिओ व्यतिरिक्त इतर एक्झरसाइजवरही भर देतो.
* सौंदर्य खुलविण्यासाठी विटॅमिन ‘सी’ची गरज असते, म्हणून रणबीर रोज सकाळी विटॅमिन ‘सी’ युक्त मोसंबीचा ज्यूस सेवन करतो. तसेच नाश्त्यामध्ये दूधासोबत कॉनफ्लेक्स ब्राउन ब्रेड विना योकचे अंडे खाणे पसंत करतो.
* दुपारच्या जेवणात तंदुरी चिकन, डाळ, चपाती आणि सोबत दही घेणे पसंत करतो.
* संध्याकाळी फ्रुट ज्यूस किंवा ग्रीन टी घेतो शिवाय रोजच्या डायटमध्ये प्रोटीन शेक असतोच.
* रणबीरच्या रात्रीच्या जेवणात फिश किंवा ग्रिल्ड चिकन यांचा समावेश असतो.
* रणबीरची ‘हलीम’ ही अतिशय फेवरेट डिश असून भेंडी, वडापाव, डोसादेखील खूप आवडते.
* त्याला जपानी फूड तसेच जंगली मटन खाण्याचाही मोठा शौक आहे.