शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मुलांना गणिताची भीती वाटते का?; 'हा' असू शकतो आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 16:30 IST

गणित एक असा विषय आहे ज्याला अनेक मुलं घाबरतात पण अनेक मुलांना तो आवडतोही. अनेकांना तर गणिताची इतकी भिती वाटते की, गणिताचा पेपर म्हटलं की त्यांच्या तोंडचं पाणीचं पळून जातं.

गणित एक असा विषय आहे ज्याला अनेक मुलं घाबरतात पण अनेक मुलांना तो आवडतोही. अनेकांना तर गणिताची इतकी भिती वाटते की, गणिताचा पेपर म्हटलं की त्यांच्या तोंडचं पाणीचं पळून जातं. तुम्हीही तुमच्या मुलांची भिती घालवण्यासाठी त्यांना 'हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे' असं सांगितलं असेलचं. तसेच या विषयावर थोडीशी मेहनत घेतली तरी पूर्ण मार्क्स मिळवणं शक्य होतं, अशा गोष्टी ट्राय केल्या असतील. परंतु तुम्ही त्यावेळी खरचं तुमच्या मुलांच्या मनाची अवस्था समजून घेता का? या विषयाबाबत त्यांच्यावर दबाव आणला तर मात्र मुलं डिप्रेशनमध्ये येऊ शकतात. यामुळे त्यांना एका ठराविक वेळेनंतर या विषयाचा राग येऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, मुलांमध्ये गणिताबाबत वाढत्या भितीमुळे ते 'मॅथ्स एंजायटी'ने ग्रस्त होऊ शकतात. 

सेंटर फॉर न्यूरोसायन्स इन एज्युकेशनद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, जास्तीत जास्त मुलं गणित विषयामुळे डिप्रेशनमध्ये जात आहेत. या संशोधनामधून मुलांचे आई-वडिल आणि वर्गशिक्षक यांना त्यांच्या तणावाचं कारण सांगण्यात आलं. हे संशोधन 1000 इटालियन मुलांवर आणि 1700 लंडनमधील मुलांवर करण्यात आलं होतं. संशोधन व्यवस्थित केल्यानंतर संशोधक या निष्कर्षांवर पोहोचले की, प्रायमरी आणि सेकेंडरी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेमध्ये मुली मॅथ्स एंजायटीने ग्रस्त होत आहेत. संशोधनामध्ये या गोष्टीचा खुलासा करण्यात आला की, असं होण्यामागील कारण म्हणजे मुलं विषय समजून घेण्याआधीच या विषयाला घाबरण्यास सुरुवात करतात आणि डिप्रेशनमध्ये जातात. याव्यतिरिक्त त्यांना या विषयामध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळेही ते आणखी त्रस्त होतात. हे संशोधन करणारे संशोधक डेनिस सांगतात की, हे खरं आहे की, मॅथ्स एंजायटी प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे होते. परंतु आम्ही आपल्या रिसर्चच्या माध्यामातून काही अशी कारणं शोधली आहेत, जी प्रायमरी आणि सेकेंडरी दोन्ही मुलांमध्ये सारखीच दिसून येतात. 

या संशोधनामधून आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे शाळेमध्ये शिक्षकांची हा विषय शिकवण्याची पद्धत. या संशोधनातून मुलांनी स्वतः याबाबत तक्रार केली आहे. त्यांच्या शाळेमध्ये हा विषय वेगवेगळ्या पद्धतींनी शिकवला जातो, ज्यामुळे ते नेहमी कन्फ्यूज होतात. तेच सेकेंडरी शाळांमधील मुलांच्या सांगण्यानुसार, पालक आणि मित्रांसोबतच्या खराब नात्यांमुळे ती तणावामध्ये असतात. याव्यतिरिक्त प्रत्येक इयत्तेनुसार, अभ्यासाच्या वाढत्या दबावामुळेही मुलं तणावामध्ये असतात. तसं आश्चर्य तर या गोष्टींचं वाटतं की, जी मुलं गणितामध्ये हुशार असतात. त्यांनाही अनेकबाबतीत तणाव जाणवू लागतो. जी मुलं गणितात हुशार असतात, त्यांच्या पालकांना फक्त मार्कांशी घेणंदेणं असतं. असं केल्यामुळे त्या मुलांमध्ये हळूहळू तणाव दिसू लागतो आणि ती भविष्यामध्ये त्या फिल्डमध्येही परफॉर्म करू शकत नाहीत जिथे ती परफेक्ट असतात. 

संशोधकांनी सांगितल्यानुसार, ते या वाढणाऱ्या ट्रेन्डला फार चिंताजनक मानतात. त्यांच्यानुसार, मुलं एका चक्रव्यूहामध्ये फसतात. ज्यातून बाहेर पडणं त्यांना अवघड वाटतं. त्यांच्यानुसार मॅथ्स एंजायटीमुळे मुलं व्यवस्थित परफॉर्म करू शकत नाहीत आणि त्यानंतर कमी मार्कांमुळे तणावामध्ये येतात. 

या सशोधनामध्ये संशोधकांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही महत्त्वाची पावलंही उचलंली. त्यांनी सांगितले की, या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी सर्वात आधी शाळेतील वर्गशिक्षकांना या गोष्टीचा विचार करावा लागतो की, मुलं मॅथ्स एंजायटीने ग्रस्त होऊ शकतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या परफॉर्मन्सवर पडतो. याव्यतिरिक्त शिक्षकांनाही त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन आणंणं गरजेचं आहे. एवढचं नाही तर मुलांच्या आई-वडिलांनीही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की, गणिताबाबत मुलांवर दबाव आणल्याने त्यांच्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. 

संशोधकांनी अशी आशा व्यक्त केली की, जर या गोष्टींवर लक्ष दिलं तर लवकरच या परिस्थितीमध्ये सुधारणा करणं शक्य होतं. त्यांनी या गोष्टीचाही स्विकार केला की, सध्याची परिस्थिती फार चिंताजनक आहे. एका संशोधनानुसार, यूकेमध्ये प्रत्येक पाच मुलांमधील एका मुलाला गणिताबाबत असलेला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्रास होतो. 

टॅग्स :Parenting Tipsपालकत्वHealth Tipsहेल्थ टिप्सexamपरीक्षाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी