साखरेऐवजी गुळाचा वापर करत असाल वेळीच व्हा सावध, किडनी होऊ शकते फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 18:02 IST2025-03-08T18:01:26+5:302025-03-08T18:02:21+5:30

Health Tips : बरेच लोक साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर करतात. पण तुमची एक चूक तुमच्या किडनी खराब करू शकते.

FDA seized adulterated jaggery sample that can damage kidney | साखरेऐवजी गुळाचा वापर करत असाल वेळीच व्हा सावध, किडनी होऊ शकते फेल!

साखरेऐवजी गुळाचा वापर करत असाल वेळीच व्हा सावध, किडनी होऊ शकते फेल!

Health Tips : लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयरोगांचा धोका वाढतो म्हणून हेल्थ एक्सपर्ट नेहमीच साखर किंवा गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला देतात. साखरेमध्ये किंवा गोड पदार्थांमध्ये कॅलरी जास्त असतात आणि पोषण कमी. अशात बरेच लोक साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्यात काही चुकीचं देखील नाही. बरेच लोक साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर करतात. पण तुमची एक चूक तुमच्या किडनी खराब करू शकते.

साखरेऐवजी गूळ खाणं चांगलंच आहे. पण आजकाल गुळात नुकसानकारक केमिकल्सचा वापर केला जात आहे. अशात भेसळयुक्त गूळ किडनीसाठी कसा धोकादायक आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सोबतच गुळाची शुद्धता कशी ओळखावी हेही जाणून घेऊ.

इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार, बंगळुरू शहरात एफडीएला काही भेसळयुक्त गुळाचे सॅम्पल मिळाले आहेत. टेस्ट केल्यानंतर या गुळात वॉशिंग पावडर आणि चॉक पावडर मिक्स केल्याचा खुलासा झाला. सोबतच यात मेटानिल येलो नावाचा सोनेरी रंगही टाकण्यात आला.  

वॉशिंग सोडा घातक

रिपोर्टनुसार, वॉशिंग सोड्याचा वापर सफाई आणि इंडस्ट्रिअल यूससाठी केला जातो. यात भरपूर प्रमाणात सोडिअम कार्बोनेट असतं. हे खाल्ल्यास शरीराचं नुकसान होतं. तोंड, घशा आणि पोटात जळजळ होऊ शकते. तसेच यानं उलटी आणि डायरियाही होऊ शकतो. टिश्यू जळूही शकतात आणि आतड्यांमध्ये अल्सरही होऊ शकतो.

सोनेरी रंगही घातक

हा रंग खाण्याच्या पदार्थांमध्ये टाकण्यावर बंदी आहे. पण बरेच लोक कायदा तोडून हा रंग मिठाई, हळद आणि डाळींमध्ये मिक्स करतात. या रंगामुळेही मळमळ, उलटी, पोटदुखी आणि डायरिया यांसारख्या समस्या होऊ शकतात.

किडनी-लिव्हरचं नुकसान

वॉशिंग सोड्यातील केमिकलमुळे लिव्हर आणि किडनीचं मोठं नुकसान होऊ शकतं. हे अवयव फेलही होऊ शकतात. एका रिसर्चनुसार, मेटानिल येलो रंग ओटोटॉक्सिसिटी, हेपाटोटॉक्सिसिटी आणि आतड्यांना डॅमेज करतो. यामुळे किडनी, लिव्हर डॅमेज होऊ शकतात.

कशी चेक कराल शुद्धता?

FSSAI नुसार, एका पारदर्शी ग्लासमध्ये पाणी टाका. आता यात १० ग्रॅम गुळाचं पावडर टाका. जर गुळामध्ये चॉक पावडर मिक्स केलं असेल तर पाण्यात खाली येऊ बसेल.

Web Title: FDA seized adulterated jaggery sample that can damage kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.