शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

कोरोनामुळे डोळ्यांच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ, 'हे' आजार इतके गंभीर की तुम्ही व्हाल कायमचे अंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 12:44 IST

कोरोना महामारीदरम्यान वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कॉम्प्युटर स्क्रीन समोर सतत बसल्याने दृष्टी खराब होते. तसेच डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

निरोगी आरोग्यासाठी शरीरात आवश्यक ती पोषकतत्त्व असणं जरुरी असते. शरीराच्या इतर भागांप्रमाणे डोळ्यांनाही निरोगी राहण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वांची गरज भासते. पौष्टिक आहार डोळ्यांच्या कार्यासाठी फार महत्त्वाचा असतो. पौष्टिक आहारातील पोषक घटक डोळ्यांना हानिकारक प्रकाशापासून वाचवतात. तसेच वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांपासून देखील सुरक्षित ठेवतात.

कोरोना महामारीदरम्यान वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कॉम्प्युटर स्क्रीन समोर सतत बसल्याने दृष्टी खराब होते. तसेच डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, जसे की कोरडे डोळे, डोळ्यांचा ताण आणि थकवा, अंधुक दृष्टी, डोकेदुखी. शारीरिक हालचालींचा अभाव, खाण्याच्या विचित्र सवयी, वारंवार खाणे हे देखील डोळ्यांच्या समस्यांना कारणीभूत ठरत असल्याचे सीनियर कंसल्टन्ट डॉ. विनीत सहगल यांनी सांगितले.

पोषक घटकांच्या कमतरतेमुळे येऊ शकतात ‘या’ समस्याडोळ्यांना अनुकूल असणाऱ्या पोषक घटकांपैकी ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि झिंक सारखे घटक डोळ्यांच्या गंभीर आजारांचा धोका कमी करतात, ज्यामध्ये वाढत्या वयाशी संबंधित मॅक्युलर डिजनरेशन आणि मोतीबिंदू यांचा समावेश आहे. व्हिटॅमिन एची कमतरता असलेल्या मुलांना अवॉइडेबल ब्लाइंडनेस तसेच अतिसार आणि गोवर यासारख्या गंभीर आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका जास्त असतो.

काय उपाय करता येतील?डोळ्याच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटकांमध्ये काही पोषक घटक असे आहे की, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि सुकामेवा यांमध्ये उपलब्ध असतात. योग्य आहाराव्यतिरिक्त, शारीरिक व्यायाम देखील मोतीबिंदू, कोरडे डोळे, ग्लूकोमा आणि इतर गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स