ना होईल गॅस, ना येईल ढेकर, जाणून घ्या मुळा खाण्याची योग्य पद्धत; Acidity लगेच होईल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:40 IST2025-01-15T14:39:48+5:302025-01-15T14:40:57+5:30

Radish Eating Method : अनेकांना हे माहीत नसतं की, मुळा पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतो. मात्र, त्यासाठी मुळा खाण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे.

Expert told the right way to eat radish to treat acid reflux | ना होईल गॅस, ना येईल ढेकर, जाणून घ्या मुळा खाण्याची योग्य पद्धत; Acidity लगेच होईल दूर!

ना होईल गॅस, ना येईल ढेकर, जाणून घ्या मुळा खाण्याची योग्य पद्धत; Acidity लगेच होईल दूर!

Radish Eating Method : मुळ्याला सुपरफूड मानलं जातं. हिवाळ्यात भरपूर लोक मुळा सलाद म्हणून खातात, तर काही लोक याचे पराठेही खातात. काही लोकांना मुळा खाणं आवडत नाही. कारण मुळा खाल्ल्यानं गॅस होतो आणि ढेकर येतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मुळा पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतो. मात्र, त्यासाठी मुळा खाण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे.

एका आयुर्वेद एक्सपर्ट्सनी मूळा खाण्याच्या योग्य पद्धतीबाबत सांगितलं आहे. मुळ्याच्या मदतीनं तुम्ही अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करू शकता. फक्त मुळा खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. ही पद्धतीनं मुळा खाल तर गॅस, ढेकर या समस्याही दूर होतील.

अ‍ॅसिड रिफ्लक्स होणार बंद

मुळा खाताना एक छोटं काम केलं तर तुमची अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या काही दिवसात औषध न घेता दूर होऊ शकते. जर मुळा रात्रभर एका पदार्थात मिक्स करून ठेवला तर तो औषधासारखं काम करू शकतो.

मुळा खाण्याची योग्य पद्धत

सगळ्यात आधी मुळा सोलून त्याची साल काढा. नंतर कापून छोटे छोटे तुकडे करा. त्यावर सैंधव मीठ टाकून एका जाळी असलेल्या भांड्यात ठेवा. रात्रीभर यातलं पाणी निघून जाईल. सकाळी कापलेला मुळा साध्या पाण्यानं घुवून खाऊ शकता.

३ ते ४ दिवसात मिळेल आराम

मुळ्यातील जे तत्व गॅस, ढेकरचं कारण ठरतात ते या मिठात मुळा ठेवल्यावर निघून जातात. तसेच त्यात सैंधव मिठातील मिनरल्सही येतात. अशाप्रकारे मुळा एका औषधासारखं काम करतो. केवळ ३ ते ४ दिवसात तुम्हाला आराम मिळेल आणि अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या दूर होईल.

अ‍ॅसिड रिफ्लक्सची लक्षणं

अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या झाल्यावर शरीरात काही लक्षणं दिसतात. ज्यात छातीत जळजळ, घशापर्यंत अ‍ॅसिड येणे, छातीत वेदना, पोटाच्या वरच्या भागात दुखणं, जेवण करण्यात अडचण, घशात गाठ असल्यासारखं वाटणं.

Web Title: Expert told the right way to eat radish to treat acid reflux

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.