एक ग्लास पाण्यात 'ही' गोष्ट टाकून प्यायल्यास दूर होईल गॅस आणि ब्लोटिंगची समस्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 11:00 IST2024-08-12T10:59:43+5:302024-08-12T11:00:08+5:30
Expert home remedy in upset stomach : आज आम्ही तुम्हाला एक्सपर्ट द्वारे सांगण्यात आलेल्या काही टीप्स सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही पोट फुगणं किंवा गॅसची समस्या दूर करू शकता.

एक ग्लास पाण्यात 'ही' गोष्ट टाकून प्यायल्यास दूर होईल गॅस आणि ब्लोटिंगची समस्या...
Expert home remedy in upset stomach : पोटात गॅस होणं ही एक कॉमन समस्या आहे. ही समस्या तेव्हा होते जेव्हा तुम्ही जास्त तेलकट काही खाता किंवा रात्री उशीरा जेवता. ही समस्या तुम्ही काही घरगुती उपायांनी दूर करू शकता. अशात आज आम्ही तुम्हाला एक्सपर्ट द्वारे सांगण्यात आलेल्या काही टीप्स सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही पोट फुगणं किंवा गॅसची समस्या दूर करू शकता.
गॅसची समस्या दूर करण्याचे उपाय
जिऱ्याने होईल मदत
एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी उकडून घ्या आणि गाळून याचं सेवन करा. हा उपाय रोज केला तर गॅसची समस्या लगेच दूर होईल.
हळदीचा वापर
कच्च्या हळदीचे दोन ते तीन तुकडे घ्या. त्यांना बारीक करून पावडर तयार करा. यात काही कडूलिंबाच्या पानांचा ज्यूस टाका. या मिश्रणाच्या गोळ्या तयार करा. या गोळ्या रोज रात्री खाऊ शकता. या गोळ्या तुम्ही कोमट पाण्यात मिक्स करून सेवन करू शकता.
हळद खाण्याचे फायदे
- हळद आणि कडूलिंबाचं एकत्र सेवन केल्याने ब्लोटिंगची समस्या लगेच दूर होईल, सोबतच इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होईल. याने पोटातील जंतूही नष्ट होतील.
- या मिश्रणाच्या सेवनाने तुम्हाला रक्त शुद्ध करण्यासही मदत मिळेल. तसेच याने जुलाब आणि डायरियाची समस्याही दूर होते.