कोरोनाला रोखणारी आणि सर्वसामान्यांना परवडणारी लस 'या' महिन्यापर्यंत येणार, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:20 PM2020-05-17T13:20:25+5:302020-05-17T13:28:37+5:30

कोरोनावर मात करणारी लस जर विकसीत करण्यात आली तर ती सगळ्यांना सहज उपलब्ध होणारी आणि परवडणारी असेल

Experimental vaccine known as chadox1 ncov 19 to provide protection agains the covid 19 myb | कोरोनाला रोखणारी आणि सर्वसामान्यांना परवडणारी लस 'या' महिन्यापर्यंत येणार, तज्ज्ञांचा दावा

कोरोनाला रोखणारी आणि सर्वसामान्यांना परवडणारी लस 'या' महिन्यापर्यंत येणार, तज्ज्ञांचा दावा

googlenewsNext

कोरोनावर लस शोधण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. कारण दिवसेंदिवस जगभरात कोरोनाचं संक्रमण वाढत चाललं आहे. तर मृतांची संख्या सुद्धा वाढत चालली आहे.  कोरोनावर मात करणारी लस जर विकसीत करण्यात आली तर ती  सगळ्यांना सहज उपलब्ध होणारी आणि परवडणारी असेल तर असं मत ऑक्सवर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि संशोधकांनी व्यक्त केलं आहे. रॉयटर वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान ऑक्सवर्ड जेनर संस्थेचे संचालक अड्रायन हिल यांनी सांगितले की, ही लस सर्व कमी किंमतीत आणि सर्वत्र उपलब्ध असेल.

संशोधन सुरु असलेली लस 'ChAdOx1 nCoV-19' या नावाने ओळखली जाते.  जागतीक स्तरावर या लसीचा पुरवठा होणार असून ही एक सिंगल डोस लस आहे. ही लस सर्व ठिकाणांवर अगदी शेवटच्या रुग्णापर्यंत पोहोचावी असं हिल यांचं म्हणणं आहे.  सुरूवातीला ६ माकडांवर या लसीची टेस्ट करण्यात आली.

काही माकडांमध्ये एका डोसमध्येच वायरस विरुद्धची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला सुरुवात झाल्याचे १४ दिवसात दिसून आले तर इतरांना सर्वसाधारण २८ दिवसांचा कालावधी लागला. जुलै किंवा ऑगस्टपर्यंत ही लस सज्ज असेल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

या लसीचा प्रयोग कॅनडामध्ये होणार असून कॅनडाच्या नॅशनल काऊन्सिलने कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यासाठी चीनसोबत जाण्याचं ठरवलं आहे. चीनची कंपनी आणि कॅनडाने संयुक्तपद्धतीने तयार केलेल्या Ad5-nCoV लसीचे प्रयोग कॅनडामध्ये होणार आहेत.

(शरीरात जमा झालेले किटाणू गंभीर आजारांना देऊ शकतात निमंत्रण, 'या' उपायाने राहा निरोगी)

(आता अँटीजन टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाची तपासणी होणार; कशी होते 'ही' टेस्ट जाणून घ्या)

Web Title: Experimental vaccine known as chadox1 ncov 19 to provide protection agains the covid 19 myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.