जास्त दु:खी राहिल्याने शरीरावर होणाऱ्या 'या' गंभीर परिणामांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 11:22 IST2019-11-21T11:19:35+5:302019-11-21T11:22:36+5:30
कोणत्याही प्रकारच्या दु:खाने, त्रासाने आणि तणावाने केवळ मनुष्याला मानसिक रूपानेच त्रास होतो असे नाही तर याचे शरीरावरही वाईट परिणाम बघायला मिळतात.

जास्त दु:खी राहिल्याने शरीरावर होणाऱ्या 'या' गंभीर परिणामांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल!
(Image Credit : gulfnews.com)
कोणत्याही प्रकारच्या दु:खाने, त्रासाने आणि तणावाने केवळ मनुष्याला मानसिक रूपानेच त्रास होतो असे नाही तर याचे शरीरावरही वाईट परिणाम बघायला मिळतात. प्रमाणापेक्षा जास्त दु:खी राहिल्याने शरीरात सूज वाढू लागते, हळूहळू तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होऊ लागते. इतकेच नाही तर सतत दु:खी राहिल्याने हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर आणि ब्लड क्लॉटिंगाच धोकाही वाढतो. चला जाणून आपल्या शरीरासाठी दु:ख आणि तणाव कशाप्रकारे घातक आहे.
हृदयासाठी घातक
जेव्हा तणावाची तुम्हाला सवय होते तेव्हा एड्रेनलीन हार्मोन्सच्या रिलीज होण्यात आणि ब्लड प्रेशरमध्ये अचानक चढउतार होत असल्याने क्रॉनिक डिजीज निर्माण होऊ शकतात. अनेकदा तणावामुळे हार्ट सिंड्रोमही होऊ शकतो. यात व्यक्तीला अचानक अनेकदा हृदय विकाराचे झटकेही पडतात.
डोक्यात अधिक वेदना होणे
अनेक रिसर्चमधून हे समोर आले आहे की, जे लोक जास्त काळापासून दु:खी राहतात, त्यांच्या मेंदूवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या मेंदूतील सर्वच मांसपेशींध्ये असह्य वेदना होतात आणि असे लोक नियमित डोकेदुखीची तक्रार करत राहतात. सोबतच मेंदूत नसांमध्ये ब्लड क्लॉटिंगही होऊ शकतं.
पोटाच्या समस्या
दु:खं आणि तणावामुळे पचनक्रियेवरही प्रभाव पडतो. जास्त दु:खी राहणाऱ्यां लोकांची पचनक्रिया फार हळुवार होते. या कारणाने त्यांना भूक लागणंही बंद होतं. हळूहळू या लोकांमध्ये गॅसची समस्या अधिक वाढू लागते. तसेच व्यक्तीला उलट्या आणि चक्कर येऊ लागण्याची समस्याही वाढू लागते.
शरीरात पाण्याची कमतरता
जास्त दु:खी राहिल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. असं होण्याचं कारण म्हणजे ब्लड सर्कुलेशनचा वाढतं. याकारणाने काही वेळातच तुम्हाला थकवा जाणवू लागतो. शरीरात आधीच असलेलं पाणी कमी होऊ लागतं. याने त्वचा कोरडी आणि डार्क होऊ लागते.
इन्फेक्शनचा धोका
जास्त दु:खी राहिल्याने लोकांची इम्यूनिटी हळूहळू कमी होऊ लागते. त्यानंतर शरीरात इन्फेक्शन संवेदनशील होऊ लागतं. अशात व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन लगेच जाळ्यात घेतं. कमजोर रोगप्रतिकारक शक्तीमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होऊ लागतात.