देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 11:13 IST2025-09-27T11:12:56+5:302025-09-27T11:13:25+5:30
जन्मावेळी ऑक्सिजनचा अभाव, झालेली दुखापत तसेच न्यूमोनिया या कारणांनी नवजात बालकांचे मृत्यू होतात

देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
नवी दिल्ली - देशातील ५ ते ९ वर्षे वयोगटातील एक तृतीयांश मुलांमध्ये ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण जास्त अधिक आहे. विशेषतः पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील राज्यांतील या वयोगटांतील मुलांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक तर महाराष्ट्रात ते १९.१ टक्के आढळले.
ट्रायग्लिसराइड्सचे (रक्तातील चरबीचा एक प्रकार) प्रमाण उच्च पातळीवर असलेल्या मुलांना भविष्यात हृदयविकार होण्याचा धोका असतो. सरकारने ‘चिल्ड्रेन इन इंडिया २०२५’ हा अहवाल तयार केला असून त्यातून ही माहिती समोर आली आहे.
१६ टक्के मुलांमध्ये प्रमाण अधिक : जन्मावेळी ऑक्सिजनचा अभाव, झालेली दुखापत तसेच न्यूमोनिया या कारणांनी नवजात बालकांचे मृत्यू होतात. तसेच देशात १६% किशोरवयीन मुलांमध्ये ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण जास्त असल्याचेही आढळले आहे.
ट्रायग्लिसराइड्स कमी करण्याचे उपाय काय?
आहार : साखर, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, शीतपेये यांचे प्रमाण कमी करणे.
वजनावर नियंत्रण : जास्त कॅलरी टाळून आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकारा.
व्यायाम : नियमित व्यायाम हा ट्रायग्लिसराइड्स कमी करण्याचा उत्तम उपाय आहे.
मद्यपान : मद्यपान पूर्णपणे टाळणे अतिशय आवश्यक आहे.
अन्य विकार : मधुमेह व अन्य आजार असल्यास नियमित उपचार करून ते नियंत्रणात ठेवा