शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

किडनीचे विकार असणाऱ्यांनी लिंबूपाणी प्यावे का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 17:49 IST

लिंबू पाण्यात (Lemon Water) व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक अ‌ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ते मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनाही घेता येतं.

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणं हा अनेकांच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग असतो. लिंबामध्ये 'क' जीवनसत्त्व (व्हिटॅमिन सी - Vitamin C) असतं. ते शरीरात कॅल्शियम शोषण्याची प्रक्रिया सुधारतं. हाडांची घनता म्हणजेच मजबूती राखण्यासाठी हे आवश्यक आहे. पण किडनीचे आजार असलेल्यांनी लिंबू पाणी प्यावं का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

मूत्रपिंडाशी (किडनी - Kidney) संबंधित समस्या असलेल्या रुग्णांवर काय होतो परिणाम ?लिंबू पाण्यात (Lemon Water) व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक अ‌ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ते मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनाही घेता येतं.

मूत्रपिंड रक्तातील विषारी पदार्थ काढून बाहेर टाकण्याचं काम करतं. यासोबतच रक्तदाब नियंत्रित करणं, हाडांचं आरोग्य नियंत्रित करणं तसंच, क्रिएटिनिन आणि युरिक अ‌ॅसिडसारख्या रसायनांची पातळी नियंत्रित करणं हे देखील काम मूत्रपिंड करतं.

क्रॉनिक किडनी डिसीज (Chronic kidney disease) ही अशी स्थिती आहे ,ज्यामध्ये मूत्रपिंड रक्त शुद्धीकरण किंवा रक्तातील अपायकारक पदार्थ काढून टाकण्याचं काम (फिल्टर - Filter - गाळणे) पूर्ण ताकदीनं करू शकत नाही. त्यामुळं रक्तात विषारी आणि टाकाऊ पदार्थ तसेच राहतात किंवा ते जमा होण्याचं प्रमाण वाढतं. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं आणि यामुळं स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

लिंबू पाणी प्यायल्यानं क्रिएटिनिन (Creatinine) कमी होते का?लिंबू पाणी प्यायल्यानं क्रिएटिनिनची पातळी कमी होत नाही, पण ती वाढतही नाही. क्रिएटिनिन शरीरात तयार होणारा अपायकारक पदार्थ किंवा कचरा उत्पादन आहे. स्त्रियांमध्ये, क्रिएटिनिनची पातळी सामान्यतः ९५ मिली प्रतिमिनिट पर्यंत असते. तर पुरुषांमध्ये ते १२० मि.ली.पर्यंत असते.

शरीरातील क्रिएटिनिन क्लिअरन्सवर (creatinine clearance) मूत्रपिंडं कसं कार्य करतात, हे तुमचं वय, वजन आणि मूत्रपिंडाची स्थिती यावर अवलंबून असतं. लिंबू पाणी प्यायल्याने क्रिएटिनिनची पातळी वाढत नाही किंवा कमी होत नाही. मूत्रपिंडाचा आजार तीव्र असलेल्या रुग्णांना लिंबूपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, ते जास्त प्रमाणात पिऊ नका.

जास्त प्रमाणात लिंबू पाणी किंवा लिंबाचा रस प्यायल्याने मळमळ, चक्कर येणे, जुलाब आणि उलट्या होऊ शकतात. कारण याच्यामुळं लघवीचं प्रमाण वाढतं. वारंवार लघवीला गेल्यामुळं शरीरातून द्रव काढून बाहेर टाकला जातो. यामुळं डिहायड्रेशनचा (Dehydration - शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं) त्रास होऊ शकतो.

लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळलिंबूपाणी पिण्याची अशी काही निश्चित वेळ नाही. तथापि, सकाळी ते प्यायल्यानं तुम्हाला सर्वांत जास्त फायदा होईल. कारण, ते शरीरात अल्कधर्मी वातावरण तयार करते. जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा शरीर स्वतःला डिटॉक्सिफाय करते. जर तुम्ही काही अल्कलाईन घेतले तर, ते pH संतुलन राखण्यास मदत करते.

अधिक फायदे मिळवण्यासाठी आले आणि मध घालून लिंबू पाणी पिऊ शकता. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत, जे किडनीच्या कार्यासाठी उपयुक्त आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स