Health Tips : तुम्हीही घाईघाईने आणि उभं राहून जेवण करता का? वेळीच व्हा सावध नाही तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 09:31 AM2021-02-16T09:31:18+5:302021-02-16T09:32:02+5:30

Health : एका सर्व्हेनुसार, उभं राहून जेवणं करणं तुमच्या आरोग्यासाठी (Health) नुकसानकारक ठरू शकतं. याचा अर्थ असा झाला की, घाईघाईने जेवण करणं तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

Eating while standing is bad habit for health | Health Tips : तुम्हीही घाईघाईने आणि उभं राहून जेवण करता का? वेळीच व्हा सावध नाही तर....

Health Tips : तुम्हीही घाईघाईने आणि उभं राहून जेवण करता का? वेळीच व्हा सावध नाही तर....

googlenewsNext

Eating Habits : जेवण करण्याची आपापली वेगवेगळी पद्धत असते.  कुणी उभं राहून जेवतात तर कुणी डायनिंग डेबलवर बसून जेवण करतात. खाली जमिनीवर मांडी घालून जेवायला बसण्यााची पारंपारिक पद्धत मागे पडत चालली आहे. अशात जर तुम्ही उभे राहून किंवा घाईघाईने जेवण करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. असं करणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. एका सर्व्हेनुसार, उभं राहून जेवणं करणं तुमच्या आरोग्यासाठी (Health) नुकसानकारक ठरू शकतं. याचा अर्थ असा झाला की, घाईघाईने जेवण करणं तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

सकाळी शाळा-कॉलेज किंवा ऑफिस जाताना उशीर होऊ नये म्हणून लोक जेवणाला योग्य वेळ देऊ शकत  नाहीत आणि घाईघाईत ब्रेकफास्ट किंवा जेवण संपवतात. एका रिसर्चनुसार,  जर एखादी व्यक्ती उभं राहून जेवण करत असेल तर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याच्या शरीरातील काही ग्रंथी काम करणं बंद करतात आणि ती व्यक्ती सतत तणावात राहू शकते. जेव्हा आपण उभे राहून जेवण करतो तेव्हा अन्न पचायला वेळ जास्त लागतो. आणि घाईघाईत आपण जास्त जेवण करतो. (हे पण वाचा : सामान्य वाटणारी 'ही' ६ लक्षणं असू शकतात ब्लड कॅन्सरचा संकेत; दुर्लक्ष करू ठरेल जीवघेणं )

उभं राहून जेवल्याने बिघडतं पॉश्चर

उभं राहून जेवण केल्याने शरीराचं पॉश्चर बिघडतं. जेव्हा आपणं उभे राहून जेवण करतो तेव्हा फार जास्त वाकतो, तसेच स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी शरीराच्या कोणत्याही एका भागावर जास्त जोर देतो. जर रोजच आपण असं केलं तर याचा प्रभाव पाठीच्या कण्यावर पडू शकतो.

मांडी घालून जेवण्याचे फायदे

खाली बसून जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. एकतर बॉडी पोश्चर सधारतो. खाली बसून जेवण केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला राहतो. क्रॉस-लेग्स म्हणजे मांडी घालून बसल्याने नसांमधील तणाव दूर होतो. त्यामुळे रोज खाली बसून जेवण केलं तर  तुम्हाला फायदाच होईल. सोबतच खाली बसून जेवणं पाठीसाठी चांगलं आहे. (हेे पण वाचा : सावधान! आता आपली स्वत:ची 'फौज' तयार करत आहे कोरोना व्हायरस, ३ नवे व्हेरिएंट जे आणू शकतात वादळ...)

पचनक्रिया होऊ शकते खराब

घाईघाईने जेवण केल्याने पचनक्रिया खराब होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या शरीरात फॅट वाढू लागतं आणि तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ लागता. त्यामुळे खाली बसून मांडी घालून जेवण कराल तर तुमचा फायदा आहे. बसून जेवल्याने पोट लवकर भरतं. अशात वजन कंट्रोल करण्याच्या उद्देशाने असं करणं फायदेशीर आहे. त्यामुळे वेळीच तुमच्या सवयी बदला.

उभं राहून किंवा चालता-फिरता खाऊ नका

नेहमीच बघितलं असेल की, लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमात लोक उभे राहूनच जेवण करतात. तुम्हीही असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा. मुळात उभं राहून जेवण करताना तुम्हाला भूकेचा अंदाज लागत नाही आणि अशात तुम्ही जास्त खाता. असं केल्याने तुमचं वजन वाढू लागतं.

पोटात गॅस होतो

पोटात अनेक कारणांमुळे गॅस तयार होतो. त्यातील एक कारण असतं घाईघाईने जेवण करणे. अशा स्थितीत अन्न पचवणं अवघड होतं. त्यामुळे पोटात जडपणा, गॅस अशा समस्या जाणवू लागतात. त्यामुळे जेवण नेहमी हळू आणि बसून करावं.

कंझूमर रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यात सांगण्यात आले आहे की, आपलं वेस्टिबुलर सेंस कशाप्रकारे सेंसरी सिस्टमवर प्रभाव टाकतं. अमेरिकेतील साउथ फ्लोरिडा यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर दीपायन विश्वास यांच्या नेतत्वात करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले की, गुरूत्वाकर्षण शरीराच्या खालच्या भागात रक्त वेगाने खेचतं, ज्यामुळे हृदयाला रक्त पुन्हा वर खेचण्यासाटी जास्त वेगाने काम करावं लागतं आणि तेव्हा हृदयाची गती वाढते.

Web Title: Eating while standing is bad habit for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.