शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

ब्रेडच्या बाजूचा जळलेला भाग खाल्ल्याने होऊ शकतो 'हा' अतिगंभीर आजार, संशोधनातून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 16:47 IST

तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही ब्रेडचा (Bread) जळलेला भाग खात असाल तर, तुमची ही सवय कर्करोगाला आमंत्रण ठरू शकते.

तुम्ही ज्या पद्धतीने खाता किंवा अन्न शिजवता त्या सवयींमुळेदेखील तुम्हाला कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही ब्रेडचा (Bread) जळलेला भाग खात असाल तर, तुमची ही सवय कर्करोगाला आमंत्रण ठरू शकते. जेव्हा तुम्ही उच्च तापमानात अन्नपदार्थ जास्त काळ शिजवता, तेव्हा त्यात अ‌ॅक्रिलामाइड (Acrylamide) तयार होतं. त्यामुळे कर्करोगाचा (Cancer) धोका वाढतो.

कर्करोगाचा धोका वाढेलजळलेल्या अन्नपदार्थांमध्ये अ‌ॅक्रिलामाइड हा एक उच्च संपृक्तता (High concentration) असलेला घटक असतो. हा विशेषतः पिष्टमय पदार्थांमध्ये आढळतो, जेव्हा हे पदार्थ उच्च तापमानात बराच काळ शिजवले जातात. यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. झी न्यूजनं दिलेल्या बातमीत याविषयी माहिती दिली आहे. या खाद्यपदार्थांमुळे सामान्यतः कर्करोगाचा धोका नसतो. परंतु, आपण ते उच्च तापमानात जास्त वेळ शिजवले आणि थोडेसे जळल्यानंतरही ते खाल्ले तर कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात.

स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमुळंही असा परिणाम होतोतंदूर, बेकिंग, बार्बेक्युइंग, तळणं, ग्रिलिंग, टोस्टिंग किंवा भाजणं यासारख्या पारंपरिक स्वयंपाक पद्धती अ‌ॅक्रिलामाइडच्या निर्मितीला चालना देतात. स्वयंपाकाच्या या पद्धती आरोग्यदायी असल्याचा दावा केला जातो. कारण त्यात तेलाचा कमी वापर केला जातो. परंतु पिष्टमय पदार्थ जास्त वेळ शिजवल्यास किंवा शिजवताना जळल्यास कर्करोग होऊ शकतो.

कॅन्सर रिसर्च यूके या डिजिटल पोर्टलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात हे सांगण्यात आलं आहे. या अहवालात पुढं म्हटलंय की अ‌‌क्रिलामाइडमुळं कर्करोगाचा धोका वाढतो का यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. अ‌ॅक्रिलामाइडमुळं कॅन्सरचा धोका निर्माण होतो का किंवा रोजच्या आहारात समाविष्ट असलेले हे पदार्थ या आजाराचा धोका वाढवतात का, यावर अधिक संशोधन व्हायला हवं.

याची देखील काळजी घ्यातज्ज्ञांच्या मते, अन्नाचं स्वरूप, त्याचा प्रकार याचा कर्करोगाशी संबंध असतो. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी ताजी फळं, भाज्या, फायबरयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा. याशिवाय जास्त साखर, मीठ, स्निग्ध पदार्थयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाऊ नका.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स