रोज खोबऱ्याचं सेवन केल्याने वाढणार रोगप्रतिकारक शक्ती, हृदयही राहणार निरोगी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 10:11 AM2019-02-20T10:11:03+5:302019-02-20T10:12:38+5:30

तसे तर नारळाचं पाणी, खोबरं आणि खोबऱ्याच्या तेलाच्या चमत्कारी गुणांबाबत तुम्ही ऐकलं असेलच.

Eating coconut everyday increases immunity keeps heart healthy | रोज खोबऱ्याचं सेवन केल्याने वाढणार रोगप्रतिकारक शक्ती, हृदयही राहणार निरोगी!

रोज खोबऱ्याचं सेवन केल्याने वाढणार रोगप्रतिकारक शक्ती, हृदयही राहणार निरोगी!

Next

तसे तर नारळाचं पाणी, खोबरं आणि खोबऱ्याच्या तेलाच्या चमत्कारी गुणांबाबत तुम्ही ऐकलं असेलच. नारळांचं पाणी आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. तसंच खोबरं सुद्धा निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. खोबऱ्याचा एक तुकडा रोज खाल्ल्याने केवळ शरीराची इम्यूनिटी वाढते असं नाही तर स्मरणशक्तीही चांगली होते. कारण नारळामध्ये किंवा खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात पाण्याचं प्रमाणही जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहतं. चला जाणून घेऊ खोबरं खाण्याचे आणखीही काही आरोग्यदायी फायदे...

हृदय निरोगी ठेवतं

ओल्या खोबऱ्यामध्ये बदाम, अक्रोड मिश्रित करून रोज खावे. नारळामध्ये गुड कलेस्ट्रॉल भरपूर असतात त्यामुळे हृदय निरोगी आणि चांगलं राहतं. 

नाकातून रक्त येणे

ज्या लोकांना उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याची समस्या असेल त्यांच्यासाठी नारळ हे एका औषधीसारखं आहे. त्यामुळे खोबरं जर खडीसाखरे सोबत खाल्ल्यास नाकातून रक्त वाहण्याची समस्या दूर होईल. 

उलटी येणार नाही

अनेकांना प्रवासात किंवा काही खाल्ल्यावर उलटी येण्याची तसेच मळमळ होण्याची समस्या होत असते. त्यांनी खोबऱ्याचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवून हळूहळू चावावा. याने उलटीसारखं काही होणार नाही. 

पिंपल्स दूर करा

पिंपल्स दूर करण्यासाठी काकडीच्या रसामध्ये नारळाचं पाणी मिश्रित करून लावा. याने पिंपल्स तर दूर होतीलच सोबतच त्वचाही चांगली राहणार. 

पोटात जंतू झाल्यास

अनेकदा काही खाल्ल्यावर पोटात जंतू होतात. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी १ चमचा खोबरा किस खावा. याने पोटातील जंतू लगेच दूर होतील.

इम्यूनिटी वाढते

खोबऱ्याचं सेवन करून शरीराची इम्यून सिस्टीम मजबूत केली जाऊ शकते. कारण खोबऱ्यामध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅटी फंगल आणि अ‍ॅंटी वायरल तत्व असतात. या तत्त्वामुळे वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. खासकरून गर्भवती महिलांना याचा फायदा अधिक होतो. 

अ‍ॅलर्जीपासून बचाव

खोबरं एक चांगलं अ‍ॅंटी बायोटिक आहे. याने वेगवेगळ्या अ‍ॅलर्जीपासून तुमचा बचाव होतो. तसेच खोबऱ्याचं तेल हे एक चांगलं सनस्क्रीनही आहे. उन्हात जाण्याआधी त्वचेवर हे तेल लावल्याने त्वचा चांगली राहते. 

असा करा आहारात समावेश करा :

नारळाच्या पाणी थंड असतं त्यामुळे सकाळी अनोशापोटी किंवा दुपारी घेतल्याने अनेक फायदे होतात. 

संपूर्ण दिवसात कच्च्या नारळाच्या खोबऱ्याचा एक छोटा तुकडा तरी खा. 

दररोज निदान दोन चमचे तरी नारळाच्या तेलाचा आहारात समावेश करा

Web Title: Eating coconut everyday increases immunity keeps heart healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.