काळे मिरे आणि बदाम सोबत खाऊन दूर होतील 'या' समस्या, तुम्हालाही नसेल माहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 15:14 IST2024-01-20T15:14:09+5:302024-01-20T15:14:39+5:30
Black Pepper And Almonds Benefits :अनेकांना हे माहीत नसतं की, बदाम आणि काळे मिरे एकत्र खाल्ले तर शरीराला मोठे फायदे मिळतात. चला जाणून घेऊ याचे फायदे....

काळे मिरे आणि बदाम सोबत खाऊन दूर होतील 'या' समस्या, तुम्हालाही नसेल माहीत!
Black Pepper And Almonds Benefits : काळे मिरे आणि बदामाचं सेवन नेहमीच लोक वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करत असतात. पण काळे मिरे वेगळ्या पदार्थात टाकले जातात तर बदाम वेगळ्या पदार्थात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, बदाम आणि काळे मिरे एकत्र खाल्ले तर शरीराला मोठे फायदे मिळतात. चला जाणून घेऊ याचे फायदे....
पोटासाठी फायदेशीर
बदामात डाएट्री फायबर असतात जे पोटाला निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनासाठी मदत करतात. सोबतच काळ्या मिऱ्यांमध्ये पिपेरिन नावाचं तत्व असतं जे प्रोटीनला तोडण्यात आणि सहजपणे पचवण्यात मदत करतं. हे कॉम्बिनेशन पचन चांगल्या होण्यासाटी आणि आतड्या निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे तुम्ही जर रोज याचं सेवन केलं तर हे पोटासाठी फायदेशीर ठरतं.त टाक
मेंदुसाठीही फायदेशीर
हे तर सर्वांनाच माहीत आहे की, बदामला ब्रेन फूड म्हटलं जातं. कारण याने मेंदू फीट राहतो आणि आपल्या क्रिया योग्यप्रकारे करतो. तेच काळ्या मिऱ्यातील पिपेरिन चिंता आणि तणावही कमी करण्याचं काम करतं. इतकंच नाही तर जर तुम्ही याचं रोज सेवन केलं तर याने तुमचा मेंदू अॅक्टिव राहण्यास मदत मिळते.
ब्लड प्रेशर कंट्रोल
बदाम आणि काळे मिऱ्याच्या कॉम्बिनेशनने हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासही मदत मिळते. याने शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत मिळते. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.
सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय
सर्दी-खोकल्याची समस्या असेल तेव्हा बदाम आणि काळे मिऱ्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. याने शरीरातून तयार होणारा कफही कंट्रोल केला जाऊ शकतो.