आपण रोज किती प्लास्टिक खातो माहितीये का? वाचून चक्रावून जाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 03:16 PM2021-09-30T15:16:15+5:302021-09-30T15:19:34+5:30

दिवसेंदिवस आपल्या शरीरात हवा, पाणी आणि जेवणासोबत प्लास्टिकही पोहचत आहे. जे फार नुकसानकारक आहे.

eat so much plastic everyday with food and water knowing you will be thinking | आपण रोज किती प्लास्टिक खातो माहितीये का? वाचून चक्रावून जाल....

आपण रोज किती प्लास्टिक खातो माहितीये का? वाचून चक्रावून जाल....

Next

(Image Credit : Kim Kyung-Hoon/Reuters) 

प्लास्टिकमुळे (Plastic) आरोग्याचं-पर्यावरणाचं किती नुकसान होतं हे सर्वांनाच माहीत आहे. प्लास्टिक हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. अशात तुम्हाला हे माहीत आहे का की, आपण दररोज आपल्या खाण्या-पिण्यात प्लास्टिकचं सेवनही करतो? होय...हे खरंय. दिवसेंदिवस आपल्या शरीरात हवा, पाणी आणि जेवणासोबत प्लास्टिकही पोहचत (Eating Plastic) आहे. जे फार नुकसानकारक आहे. जर एका वर्षात किंवा आयुष्यभरात आपण किती प्लास्टिक खातो याचा विचार केला तर तुम्ही चक्रावून जाल.

डब्ल्यूडब्ल्यूएफ इंटरनेशनल (WWF International) द्वारे २०१९ मधील एका रिसर्चमधून निष्कर्ष काढण्यात आला आहे की, एका आठवड्यात आपण एका क्रेडीट कार्डच्या बरोबरीचं प्लास्टिक सेवन करतो. प्लास्टिक पिण्याच्या पाण्यापासून ते वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मिश्रित होऊन पोटात जातं. ज्यामुळे पचनतंत्राला नुकसान पोहोचतं. 

१० वर्षात आपण २.५ किलो प्लास्टिक खातो

अलजजीराच्या एका रिपोर्टनुसार, वर्षभरात फायर फायटरच्या हेल्मेटच्या बरोबरीत आपण प्लास्टिकचं सेवन करतो. तर साधारण एक दशकभरात म्हणजे १० वर्षात आपण साधारण २.५ किलोग्रॅम प्लास्टिक खातो. जर  पूर्ण आयुष्यभराचं सांगायचं तर एक व्यक्ती किलोपर्यंत प्लास्टिक खातो.

रोज किती खातो?

जर एक दिवसाबाबत सांगायचं झालं तर एका रिसर्चनुसार, रोज साधारण ०.७ ग्रॅम वजनाचं प्लास्टिक आपण खातो. ५ ग्रॅम वजनाच्या प्लास्टिक बटनाच्या प्रमाणात प्लास्टिक आपण एका आठवड्यात खातो. तर १० दिवसात आपण ७ ग्रॅम वजनाचं प्लास्टिक क्रेडीट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या बरोबरीत आपण प्लास्टिक खातो.
 

Web Title: eat so much plastic everyday with food and water knowing you will be thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.