लिंबूू खा, वजन घटवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 14:57 IST2016-10-12T09:34:27+5:302016-10-16T14:57:55+5:30
दिवसेंदिवस आपली जीवनशैली बदलत असून त्यापाठोपाठच आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत.........

लिंबूू खा, वजन घटवा !
दिवसेंदिवस आपली जीवनशैली बदलत असून त्यापाठोपाठच आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत. त्यात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या त्यामुळे मधुमेह, रक्तदाब आदी आजारांना असंख्य लोकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक उपायांपैकी लठ्ठपणावर संत्रा, लिंबू हे योग्य पर्याय असल्याचे निष्पन्न झाले आहे. संत्रे आणि लिंबाचा आहारात समावेश केल्याने लठ्ठपणामुळे निर्माण होणारे आजार कमी होतात, असे संशोधनातून नुकतेच समोर आले आहे.
लिंबूवर्गीय फळे म्हणजे संत्री, लिंबू, मोसंबी या फळांमध्ये ‘अँटीआॅक्सिडंट’ भरपूर प्रमाणात असतात. हे लठ्ठपणामुळे निर्माण होणारी विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकतात. त्यामुळे लठ्ठपणासोबत येणारे मधुमेह, हृदयविकार, जठरासंबंधित आजार दूर ठेवण्यास मदत होते. जेव्हा आपण जास्त स्निग्ध पदार्थ खातो, तेव्हा आपल्या शरीरातील स्निग्धता वाढते. ही स्निग्धता शरीरातील इतर पेशींना मारक ठरते. संत्रे आणि लिंबामधील अँटीआॅक्सिडंटस् शरीरातील स्निग्धतेला कमी करतात. दरम्यान, शास्त्रज्ञांनी यामुळे लठ्ठपणा कमी होतो, असे कोणतेही विधान केलेले नाही. यामुळे फक्त लठ्ठपणाशी संबंधित आजार आटोक्यात राहतात, असे त्यांनी म्हटले आहे.