वजन वाढवण्यासाठी नेमके काय काय करावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 11:16 IST2019-06-28T11:00:48+5:302019-06-28T11:16:23+5:30
अलिकडच्या लाइफस्टाईलमध्ये जगभरात वजन कमी करण्याच्या समस्येची सर्वात जास्त चर्चा होत असली तरी असेही अनेकजण आहेत ज्यांना वजन वाढवायचं आहे.

वजन वाढवण्यासाठी नेमके काय काय करावे?
(Image Credit : Shape Singapore)
अलिकडच्या लाइफस्टाईलमध्ये जगभरात वजन कमी करण्याच्या समस्येची सर्वात जास्त चर्चा होत असली तरी असेही अनेकजण आहेत ज्यांना वजन वाढवायचं आहे. काही कारणांमुळे अनेकांचं वजन सामान्यापेक्षा कमी असतं. तसेच अनेक रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, सामान्यापेक्षा वजन असलेल्या लोकांना हार्ट स्ट्रोकचा सर्वात जास्त धोका असतो. जर तुम्हीही सडपातळ असाल आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर आम्ही काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
प्रोटीन डाएट
कोणत्याही शरीरासाठी चांगल्या आहाराचा विषय निघतो, तेव्हा प्रोटीन डाएटचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही सुद्धा प्रोटीन डाएट कमी घेत असाल तर वजन कमी होऊ शकतं. चांगल्या प्रोटीनसाठी तुम्ही डेली डाएटमध्ये अंडी, मांस, मासे, चिकन, डाळी, कडधान्य तसेच डेअरी पदार्थ दूध, दही, पनीरचं सेवन करा. शरीरात प्रोटीन जास्त होतं, तेव्हा मांसपेशींची निर्मिती होते. याने तुमचं वजन वाढू शकतं.
हेल्दी फॅट
वजन वाढण्याच्या पद्धतीत सर्वात चांगला उपाय म्हणजे हेल्दी फॅट असतं. जेव्हा तुम्ही हेल्दी फॅटची डाएट घेता तेव्हा तुमच वजन सहजपणे वाढू लागतं. हेल्दी फॅट खाल्ल्याने मेटाबॉलिज्म रेटही वाढतो. हेल्दी फॅटसाठी तुम्ही ड्राय फ्रूट्स, हिरव्या भाज्या, अॅवोकोडाचं तेल इत्यादी पदार्थ खाऊ शकता.
वजन वाढवण्यासाठी एक्सरसाइज
जेव्हा तुमचं वजन कमी होतं तेव्हा केवळ डाएटने भागत नाही. यासाठी तुम्हाला आवश्यक एक्सरसाइज करणेही गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हेल्दी डाएटसोबत एक्सरसाइज करता, तेव्हा मांसपेशींचा विकास होतो. वजन वाढवण्यासाठी तुम्ही काही वेगळ्या एक्सरसाइज करू शकता.
योगा
वजन वाढवण्याची सुरूवात तुम्ही योगापासून करू शकता. योगाभ्यासात पचनक्रिया सुधारणारी अनेक चांगली आसने आहेत. पचनक्रिया चांगली असेल तर पोषण मिळतं. जेव्हा चांगलं पोषण मिळतं तेव्हा वजन वाढतं.
वजन वाढवण्याच्या योग्य पद्धती
जेव्हा तुम्ही वजन वाढवण्याच्या पद्धतींचा शोध घेत असाल तुम्ही आधी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कारण तुम्ही जर वजन वाढवण्याची एखादी चुकीची पद्धत निवडली तर नुकसान होऊ शकतं. योग्यप्रकारे वजन वाढणं हे आरोग्यासाठीही चांगलं असतं.
डाएटमध्ये करा बदल
जर तुमचं वजन सामान्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या डाएटबाबत विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन, फॅट आणि व्हिटॅमिनचं प्रमाण चेक केलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या वयानुसार आवश्यक पोषक तत्त्वांचा डाएटमध्ये समावेश करा.
(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर डाएटमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)