Easy ways to avoid liver diseases | लिव्हरसंबंधी आजारांपासून बचाव करण्याचे सोपे उपाय!

लिव्हरसंबंधी आजारांपासून बचाव करण्याचे सोपे उपाय!

लिव्हरशी संबंधित आजार आज केवळ मोठ्यांनाच नाही तर नवजात बालकांना आणि लहान मुलांनाही प्रभावित करत आहे. अशात लहान मुलं लिव्हरशी संबंधित आजारांनी ग्रस्त होऊ नये, यासाठी जागरूकता पसरवण्याची फार गरज आहे. मेंदूनंतर लिव्हर हा शरीरातील दुसरा महत्त्वाचा अवयव मानला जातो. लिव्हरच्या मदतीनेच शरीरातील इतर अवयव व्यवस्थितपणे आपलं काम करू शकतात. पण लिव्हरची काही समस्या असेल तर याची लक्षणे लवकर बघायला मिळत नाहीत. 

लिव्हरसंबधी रोगांची लक्षणे

द हेल्थ साइटने एका लेखात दिलेल्या माहितीनुसार, लिव्हरसंबंधी काही समस्या असेल तर त्याची पुढीलप्रमाणे काही प्रमुख लक्षणे बघायला मिळतात. जसे की, डोळ्यांचा पिवळेपणा, लघवीचा रंग अधिक पिवळा होणे, भूक न लागणे, मळमळ होणे, पायांवर सूज आणि वजन कमी होणे. शंभरपेक्षा अधिक असे आजार आहेत, ज्यांचा प्रभाव लिव्हरवर पडतो. जर तुम्हाला पोटाच्या आजूबाजूला सूज, पायांवर सूज, वजन कमी झाल्याची लक्षणे दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

काही सोपे उपाय

१) प्रत्येक नवजात बाळाला जन्मानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने लगेच हेपेटायटीस बी ची लस द्यायला हवी. 

२) रक्त आणि रक्त उत्पादनांचा वापर करण्याआधी हेपेटायटीस बी आणि सी यांची टेस्ट करावी. टेस्ट करून हे सुनिश्चित करावं की, रक्तात कोणत्या प्रकारचं संक्रमण तर नाही ना.

३) नेहमी स्वच्छ पाणी प्यावे. फळं आणि भाज्यांचं सेवन करण्याआधी त्या स्वच्छ करून घ्या. 

४) नवजात बाळांना जर दोन आठवड्यांपेक्षा पीलिया म्हणजेच काविळची समस्या असेल तर वेळीच त्याला लिव्हरसंबंधी काही समस्या नाही ना हे चेक करावं. तसेच निदान करून वेळीच उपचार सुरू करावे. जास्तीत जास्त बालकांना जन्मानंतर काविळ होतो, मात्र तो १० दिवसात ठीक होतो.

५) लिव्हरच्या जास्तीत जास्त आजारांमध्ये जर सुरूवातीलाच योग्य उपचार मिळाले तर परिणाम चांगले होतात. रूग्णाला पुढे होणाऱ्या त्रासापासून आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशनपासून वाचवलं जाऊ शकतं.

(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. त्याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ले म्हणून बघू नका. यातील काहीही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Easy ways to avoid liver diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.