वजन कमी करण्याचे उपाय करून थकलात? मग हे नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 12:47 PM2019-11-20T12:47:25+5:302019-11-20T12:56:07+5:30

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक स्त्रिया वजन कमी करण्यासाठी जीमला जाण्यापासून डाएट करण्यापर्यत वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. तरी देखील वजन कमी होत नाही .

Easiest way to wight loss | वजन कमी करण्याचे उपाय करून थकलात? मग हे नक्की वाचा

वजन कमी करण्याचे उपाय करून थकलात? मग हे नक्की वाचा

Next


 आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक स्त्रिया वजन कमी करण्यासाठी जीमला जाण्यापासून डाएट करण्यापर्यत वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. तरी देखील वजन कमी होत नाही . असं तुमच्या बाबतीत सुध्दा होत असेल, तर काही घरगुती उपायांचा अवलंब करुन तुम्ही नक्कीच वाढलेले वजन नियंत्रात आणू शकता. यासाठी वाचा या काही  टीप्स ज्यामुळे नैसर्गीक घटकांचा वापर करून वजन कमी करू शकता.

वजन घटवण्यासाठी आपल्या राहणीमानाकडे आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.बारीक होण्यासाठी पुरेसा व्यायाम आणि नियमीत डाएट करणे गरजेचे आहे.याशिवाय झोपेची आणि झोपेतून उठण्याची वेळ निश्चीत असणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया  कसे करता येईल वाढलेले वजन झटपट कमी.

१) व्यायाम करणेः

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात. तर सकाळी लवकर उठून गरम पाणी प्या. आणि नाश्ता करताना शरीरास पौष्टिक असणारे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. आणि व्यायाम न चुकता दररोज करा.

२) चहा, कॉफी टाळाः

काही जणांचे वजन कमी न होण्याचे कारण चहा, कॉफी यांसारख्या पेयांचे अतिसेवन हे असते.जर तुम्हाला जास्त चहा पिण्याची सवय असेल तर वजन कमी करण्यासाठी दिवसातून फक्त एकदा चहा किंवा कॉफी घ्या. 

३)  पौष्टिक आहार घ्याः  

दररोजच्या डाएट प्लान मध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. सकाळच्यावेळी फळे, दुध यांचे योग्य प्रमाणात सेवन करा.

४) झोपेच्या वेळा बदलाः

जर तुमचे वजन कमी होत नसेल तर तुमच्या झोपेच्या वेळा चुकीच्या असू शकतात.जर तुम्ही सकाळी उशीरा उठत असाल तर, वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सकाळी लवकर उठायला हवे.

 

Web Title: Easiest way to wight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.