कानातील मळ काढण्याची ही पद्धत फारच धोकादायक, तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 05:55 PM2021-11-26T17:55:34+5:302021-11-26T17:56:47+5:30

How to clean ear : सामान्यपणे लोक कान साफ करण्यासाठी ईअरबडचा वापर करतात. जे फार चुकीचं आहे. अमेरिकेतील एका एक्सपर्ट ईअरबडने कान साफ करण्याला धोकादायक सांगितलं आहे.

Earwax cleaning tricks earbuds safe ways to remove health tips | कानातील मळ काढण्याची ही पद्धत फारच धोकादायक, तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

कानातील मळ काढण्याची ही पद्धत फारच धोकादायक, तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

googlenewsNext

कानात मळ जमा होणे ही तशी सामान्य बाब आहे आणि याचा अर्थ हा नाही की, तुम्ही घाणेरडे आहात. कानातील मळ हा कानाचा बाहेरील भाग आणि ईयर कॅनलच्या कोशिकांमधून निघालेल्या नैसर्गिक तेलापासून तयार होतो. धूळ, घाम आणि डेड स्कीन सेल्स मिळून हे तेल मळात रूपांतरित होतं. ईअर वॅक्स म्हणजे मळ मुळात एक सुरक्षा कवचासारखं काम करतो. याने व्हायरस आणि हानिकारक बॅक्टेरियाला कानात जाण्यापासून रोखलं जातं. सामान्यपणे लोक कान साफ करण्यासाठी ईअरबडचा वापर करतात. जे फार चुकीचं आहे. अमेरिकेतील एका एक्सपर्ट ईअरबडने कान साफ करण्याला धोकादायक सांगितलं आहे.

अमेरिकेच्या लुइसविले यूनिव्हर्सिटीमध्ये कान, नाक आणि गळ्याचे तज्ज्ञ जेरी लिन यांनी 'द सन'सोबत बोलताना सांगितलं की, कानातील मळ आपोआपच कमी होतो आणि याबाबत फार जास्त टेंशन घेण्याची गरज नाही. जर तुमच्या कानात फार जास्त मळ झाला असेल तर तुमचा कान दुखायला लागतो. त्यामुळे त्या सफाई गरजेची असते. कधी कधी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडू शकते. पण जास्तीत जास्त लोक घरीच स्वत:हून कान साफ करतात.

डॉक्टर जेरी म्हणाले की, ईअऱबडच्या माध्यमातून कानातील वरवरचा थोडा मळ काढला जाऊ शकतो. पण कधीच ईअरबड कानाच्या खूप आत टाकू नये. हे खतरनाक होऊ शकतं आणि  ईअर कॅनलला याने नुकसान पोहोचू शकतं. इतकंच नाही तर यामुळे कानाचे पडदेही फाटू शकतात. त्यासोबतच  चुकून ईअर कॅडलिंग ट्राय करू नका. ज्यात लोक गरम मेण  कानात टाकून सफाई करतात. कान साफ करण्याची ही पद्धत फार खतरनाक आहे.

कान साफ करण्याची योग्य पद्धत

डॉक्टर जेरी म्हणाले की,  कान साफ करण्याची सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे ईअर ट्रॉप आहे. हे लिक्विड सोल्यूशन असतं आणि त्याने कानातील मळ पातळ आणि मुलायम होतो. त्यामुळे तो सहजपणे बाहेर येतो. हे लिक्विड सहजपणे मेडिकल स्टोरमध्ये मिळतं. पण हे खरेदी करण्याआधी तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. सामान्यपणे ईअर ड्रॉप लगेच काम करतात, पण जर मळ जास्त असेल आणि घट्ट बसला असेल याचा वापर एकापेक्षा जास्त वेळ करावा लागू शकतो. २०१८ च्या एका रिसर्चनुसार, पाच दिवस ईअर ड्रॉप कानात टाकल्याने कानातील मळ पूर्णपणे साफ होतो आणि त्याशिवाय कोणत्याही वस्तूचा वापर कानात करू नये. 
 

Web Title: Earwax cleaning tricks earbuds safe ways to remove health tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.