नेहमी वेगवेगळ्या वयाच्या लोकांमध्ये कानातून पाणी येण्याची किंवा कानामध्ये सतत ओलावा जाणवण्याची समस्या जाणवते, याची कारणं वेगवेगळी असू शकतात. कानामध्ये पस होणं, कानातून रक्त किंवा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं द्रव्य येणं ही एखाद्या गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात. घाबरून जाऊ नका. हे तुमच्यासोबतही होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कानातून सतत पाणी येणं किंव एखादं द्रव्य बाहेर पडणं यामागे अनेक कारणं असू शकतात. कानामध्ये एक ड्रेनेज सिस्टिम असते. ज्यामुळे कानात मळ जमा होतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु, याऐवजी सतत पाणी, रक्त किंवा पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचं द्रव्य येत असेल तर कानामध्ये इन्फेक्शन झाल्याचे संकेत आहेत.
कानात सतत द्रव्य बाहेर येण्याची ही कारणं असू शकतात -
एखाद्या प्रकारचं संक्रमण
जेव्हा एखादा वायरस किंवा बॅक्टेरिया कानाच्या मध्यभागी पोहोचतो, तेव्हा यामुळे कानाला त्रास होऊ शकतो. तेव्हा अशातच कानाच्या त्याभागात द्रव्य तयार होण्यास सुरुवात होते. कालांतराने कानातून ते द्रव्य बाहेर येऊ लागतं.
स्विमर्स इयर
ओटायटिस एक्सटर्ना म्हणजेच स्विमर्स इयर कॅनालमध्ये फंगस किंवा बॅक्टेरिया झाल्यामुळे इन्फेक्शन होतं. पाण्याच्या संपर्कात जास्त राहणाऱ्या व्यक्तींना हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पाणी कानामध्ये जाऊन इयर कॅनालच्या पडद्याला हानी पोहोचण्यास सुरुवात होते.
आघात किंवा ट्रॉमा
कानाची स्वच्छता करत असताना कानाच्या आतमध्ये कोणत्याही भागाला अचानक धक्का लागला किंवा जखम झाली तर ते कानातून पाणी येण्याचं कारण ठरू शकतं. त्यामुळे कान साफ करताना नीट काळजी घेण्याची गरज असते.
इतर कारणं
कानातून पाणी येण्यामागे अनेक कारणांचा समावेश आहे. कानाच्या आतील हाडांमध्ये होणारी इजा, ट्यूमर, जखम, एखादी गोष्ट कानामध्ये जाणं, डोक्याला दुखापत होणं यामुळेही कानाला इन्फेक्शन होऊ शकतं.
अशी घ्या कानांची काळजी -
- कानातून सतत द्रव्य बाहेर येत असेल तर कान साफ करण्यासाठी कानामध्ये काही न टाकता, बाहेरूनच अलगद स्वच्छ करून घ्या.
- स्वतःच कोणत्याही औषधाचा वापर करण्यापेक्षा डॉक्टरांकडून व्यवस्थित तपसणी करून घेऊन त्यांच्याच सल्ल्याने औषध किंवा इयर ड्रॉप कानामध्ये टाका.
- कानाच्या स्वच्छतेसाठी कॉटन किंवा स्वच्छ कपड्याचा वापर करा.
- डॉक्टरांनी सांगितलेल्या अॅन्टीबायोटिक्स आणि इतर औषधांचा डोस पूर्ण घ्या.