कोणत्या सवयींमुळे सकाळी पोट साफ होण्यास होते समस्या? वेळीच बदलाल तर निरोगी रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:37 IST2024-12-31T12:36:36+5:302024-12-31T12:37:46+5:30

Constipation Causes : काही अशा सवयी असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या झाल्याचं बघायला मिळते. अशात ही समस्या होण्याची कारणं काय असतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Due to these habits constipation increases rapidly | कोणत्या सवयींमुळे सकाळी पोट साफ होण्यास होते समस्या? वेळीच बदलाल तर निरोगी रहाल!

कोणत्या सवयींमुळे सकाळी पोट साफ होण्यास होते समस्या? वेळीच बदलाल तर निरोगी रहाल!

Constipation Causes : बद्धकोष्ठता ही एक आरोग्यासंबंधी एक कॉमन समस्या आहे. ज्यात आतड्यांवर सूज, गॅस, वेदना होते आणि मलत्याग करण्यास समस्याही होते. ही समस्या लाइफस्टाईल, आहार आणि मानसिक स्थितीमुळे होते. जर ही समस्या वेळीच दूर केली नाही तर बद्धकोष्ठतेचं रूप घेते. काही अशा सवयी असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या झाल्याचं बघायला मिळते. अशात ही समस्या होण्याची कारणं काय असतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

पाणी कमी पिणं

पाणी शरीरासाठी फार आवश्यक आहे आणि पोट साफ करण्यासही मदत करतं. जेव्हा शरीरात पाणी कमी होतं, तेव्हा आतड्यांमध्ये पाणी अवशोषित होऊ लागतं. ज्यामुळे मलत्याग करण्यास समस्या होते. त्यामुळे रोज भरपूर पाणी प्यावं, जेणेकरून पोट साफ होण्यास मदत मिळेल.

फायबरची कमतरता

आहारात फायबर कमी असणं बद्धकोष्ठतेचं कारण बनतं. फायबरमुळे आतड्या निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि विष्ठाही नरम राहते. ताजी फळं, भाज्या, कडधान्य इत्यादीमध्ये भरपूर फायबर आढळतं. जर आहारात या गोष्टींचा समावेश केला तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.

कमी शारीरिक हालचाल

शरीरिक हालचाल कमी करणं हे देखील बद्धकोष्ठता वाढण्याचं एक कारम आहे. जेव्हा आपण शारीरिक रूपानं सक्रिय राहत नाही, तेव्हा आतड्यांचं कार्य स्लो होतं. ज्यामुळे पोट साफ होण्यास समस्या होते. अशात नियमितपणे व्यायाम, योगा किंवा पायी चालावं. असं केल्यास बद्धकोष्ठता दूर होते.

आहारात असंतुलन

तेलकट, मसालेदार आणि भाजलेल्या पदार्थांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. या पदार्थांमुळे आतड्यांमध्ये सूज येते आणि गॅस तयार होतो. ज्यामुळे मलत्याग करण्यास अडचण येते. जास्त फॅट असलेले पदार्थ खाऊनही बद्धकोष्ठतेची समस्या होते. त्यामुळे आहारात संतुलन असावं. 

जेवणाची वेळ आणि पद्धत

रोजच्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या असाव्यात. जेव्हा अवेळी जेवण करतो किंवा जास्त खातो, तेव्हा पचनक्रियेवर वाईट प्रभाव पडतो. जेवण बारीक चावून करावं आणि जेवण झाल्यावर थोडा वेळ चालावं. जेवण करताना पाणी पिऊ नये. जेवणाऱ्या अर्ध्या तासानंतर पाणी प्यावं.

मानसिक तणाव आणि चिंता

मानसिक तणाव आणि चिंताही बद्धकोष्ठतेचं कारण ठरते. तणावादरम्यान शरीराचं पचन तंत्र स्लो होतं. ज्यामुळे पोट साफ होण्यास अडचण येते. योगा आणि ध्यानाच्या मदतीनं मानसिक तणाव कमी केला जाऊ शकतो. अशात बद्धकोष्ठता दूर करण्यासही मदत मिळेल.

वेळेवर टॉयलेटला न जाणं

अनेकदा संडास लागली असूनही काही लोक वेळेवर जात नाही किंवा काही कारणानं टॉयलेटला जात येत नाही. असं केल्यानं बद्धकोष्ठता वाढते. जेव्हा शरीराला मलत्याग करण्याची आवश्यकता असते, तेव्हा ते काम केलं पाहिजे.

उपाय

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी सगळ्यात आधी आहार आणि जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. पाणी भरपूर प्यावं, फायबरयुक्त पदार्थ खावेत, नियमितपणे व्यायाम करावा, मानसिक तणाव दूर करावा आणि वेळेवर टॉयलेटला जाणं हे ही समस्या दूर करण्याचे उपाय आहेत. बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी जास्त वाढू शकते.

Web Title: Due to these habits constipation increases rapidly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.