मलेरियामुळे ३० टक्के वाढतो हार्ट फेलचा धोका - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 10:22 IST2019-09-03T10:18:48+5:302019-09-03T10:22:50+5:30
अभ्यासकांनी जानेवारी १९९४ ते जानेवारी २०१७ दरम्यान मलेरियाचं संक्रमण झालेल्या रूग्णांची ओळख पटवली. या रिसर्चमध्ये रूग्णांचं सरासरी वय ३४ होतं. ज्यात ५८ टक्के पुरूष होते.

मलेरियामुळे ३० टक्के वाढतो हार्ट फेलचा धोका - रिसर्च
(Image Credit : www.sify.com)
एका नव्या रिसर्चमधून समोर आलं की, मलेरियामुळे हृदयघात म्हणजेच हार्ट फेल होण्याचा धोका ३० टक्क्यांनी वाढतो. WHO नुसार २०१८ च्या आकडेवारीनुसार, डासांमुळे होणारा मलेरिया दरवर्षी जगातील २१.९ कोटींपेक्षा अधिक लोकांना प्रभावित करतो.
मलेरियामुळे हृदयरोगात वाढ
डेनमार्कच्या हार्लेव जेनटोफ्ट युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील अभ्यासक फिलिप ब्रेनिन यांनी एका रिसर्चचा हवाला देत सांगितले की, 'आम्ही मलेरियाच्या केसेसमध्ये वाढ पाहिली. जी फार गंभीर बाब आहे. कारण मलेरियामुळे हृदयासंबंधी रोगांमध्येही वाढ बघायला मिळाली आहे. यासाठी आम्ही काही उपाय केले आहेत, पण हे एक मोठं आव्हान आहे'.
कसा केला रिसर्च?
अभ्यासकांनी जानेवारी १९९४ ते जानेवारी २०१७ दरम्यान मलेरियाचं संक्रमण झालेल्या रूग्णांची ओळख पटवली. या रिसर्चमध्ये रूग्णांचं सरासरी वय ३४ होतं. ज्यात ५८ टक्के पुरूष होते. दरम्यान जवळपास ४ हजार मलेरिया केसेस आढळल्या. रूग्णांवर ११ वर्ष करण्यात आलेल्या अभ्यासानंतर हार्ट फेलच्या ६९ केसेस समोर आल्या. हे प्रमाण सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत अधिक आहे. त्यासोबतच हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधी आजारांमुळे एकूण ६८ मृत्यू झाल्याचेही आढळले.
मलेरिया ब्लड प्रेशर प्रणाली प्रभावित करतो
ब्रेनिन यांनी सांगितले की, 'या रूग्णांमध्ये हृदयासंबंधी आजारांची ३० टक्क्यांनी वाढेची शक्यता बघण्यात आली'. असं असलं तरी यावर आणखी रिसर्च होण्याची गरज असल्याचे देखील ते म्हणाले. मात्र, अलिकडच्या काही रिसर्चमध्ये आढळलं की, मलेरिया मायोकार्डिम(मांसपेशी टिश्यू) मध्ये आवश्यक बदलांचं कारण ठरू शकतो.
(Image Credit : medicalnewstoday.com)
प्रायोगिक अभ्यासातून असंही समोर आलं की, उच्च रक्तदाबामुळे मलेरिया ब्लड प्रेशर प्रणालीला प्रभावित करू शकतो. यानेच हार्ट फेलचा धोका होऊ शकतो. त्यासोबतच मलेरिया हृदयात सूज निर्माण करणाऱ्या वाहिकांनी देखील प्रभावित करतो. ज्यामुळे फायब्रोसिस आणि त्यानंतर हार्ट फेल होऊ शकतो.
भारतात मलेरियाचं प्रमाण घटलं?
युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी यांच्यानुसार, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि कोरोनरी धमण्यांचा रोग हार्ट फेल होण्याचं मुख्य कारण आहे. हे निष्कर्ष पॅरिसमध्ये वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ कार्डिओलॉजीसोबत ईएससी कॉंग्रेस-२०१९ मध्ये सादर करण्यात आले होते.
भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेनुसार, मलेरिया होणाची शक्यता असणाऱ्या प्रमुख देशांमध्ये सामिल भारताना यापासून सुटका मिळवण्यासाठी बरंच यश मिळवलं आहे. परिषदेनुसार, भारतात मलेरियाच्या केसेसमध्ये ८० टक्के कमतरता आली आहे, २००० साली मलेरियाच्या २३ लाख केसेस समोर आल्या होत्या. त्यानंतर २०१८ मध्ये ही संख्या कमी होऊन ३ लाख ९० हजार झाली. तसेच मलेरियामुळे होणाऱ्या मृत्युच्या संख्येतही ९० टक्के कमतरता आली आहे. २००० मध्ये मलेरियाने मृत्युची संख्या ९३२ इतकी होती, नंतर २०१८ मध्ये ही आखडेवारी ८५ होती.