काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने आरोग्याला होतात हे नुकसान, जाणून कधी प्यावं पाणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 13:45 IST2023-03-25T13:44:15+5:302023-03-25T13:45:02+5:30
Cucumber Side Effects : काकडीच्या सालीमध्येही सिलिकासारखं आवश्यक पोषक तत्व असतं. पण अनेकांना काकडी खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर पाणी पित असाल तर ही चूक अजिबात करू नका.

काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने आरोग्याला होतात हे नुकसान, जाणून कधी प्यावं पाणी?
Cucumber Side Effects : उन्हाळा आता नुकताच सुरू झाला. त्यामुळे लोक या दिवसात काकडीचं अधिक सेवन करतात. काकडीने लोकांना तापत्या उन्हात थंड वाटतं. सोबतच याने आरोग्याला होणारे फायदेही अनेक असतात. काकडी एक असं फळ आहे ज्यात 95 टक्के पाणी असतं. सोबतच यात मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, मॅगनीज, व्हिटॅमिन सी आणि के असतं.
यासोबतच काकडीच्या सालीमध्येही सिलिकासारखं आवश्यक पोषक तत्व असतं. पण अनेकांना काकडी खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. जर तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर पाणी पित असाल तर ही चूक अजिबात करू नका. याने तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.
काकडी केस आणि त्वचेसाठी फार फायदेशीर असते. या फळातील पोषक तत्व शरीराला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही काकडी खाल्ल्यावर पाणी पिणं टाळलं तर. कारण काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायलात तर पचनक्रियेसंबंधी समस्या होऊ शकते. काकडी उन्हाळ्यात फार फायदेशीर मानली जाते. हेल्दी डाएटमध्ये याचं फार महत्व आहे. कारण यात व्हिटॅमिन सी, फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे शरीरातील फ्री रेडिकल्स दूर करतात.
हाडं होतात मजबूत
काकडी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे काकडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि इम्यूनिटीही वाढते. तेच काकडीची सालही फार फायदेशीर असते. पण हेही लक्षात ठेवा की, काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. कारण त्याने त्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत.
काकडी खाल्ल्यावर पाणी पिल्याचे नुकसान
- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने खाद्य पदार्थांना पचवणारं पोटातील अॅसिड योग्य प्रकारे काम करत नाही.
- जर काकडी खाऊन तुम्ही पाणी प्यायलात तुम्हाला लूज मोशन आणि डायरिया होण्याचाही धोका होऊ शकतो.
- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने शरीराची पीएच लेव्हलही डिस्टर्ब होते.