शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन शेकचं सेवन करता? वेळीच व्हा सावध, अकाली मृत्यूचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 9:52 AM

सिनेमातल्या हिरोसारखी बॉडी बनवण ही क्रेझ तरूणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी ते जिम लावण्यासोबतच इतरही अनेक गोष्टींचा आधार घेतात.

(Image Credit : The Body Book)

सिनेमातल्या हिरोसारखी बॉडी बनवण ही क्रेझ तरूणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी ते जिम लावण्यासोबतच इतरही अनेक गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यात प्रोटीन शेकचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो. तुम्हीही फिटनेससाठी प्रोटीन शेकचा वापर करत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. हा सावध राहण्याचा सल्ला एका रिसर्चमधून देण्यात आला आहे. 

प्रोटीन शेकमधील BCAA चा प्रभाव

(Image Credit : bestproteinpowder.nu)

युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या चार्ल्स पेरकिन्स सेंटरच्या संशोधकांनी एक रिसर्च केला आणि त्यातून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, प्रोटीन पावडरमध्ये असलेल्या ब्रान्च चेन अमिनो अ‍ॅसिड म्हणजेच BCAAचं अधिक सेवन केल्याने शरीरावर याचा काय प्रभाव पडतो. BCAA सप्लिमेंट्स पावडरच्या रूपातही मिळतात, जे पाण्यासोबत मिश्रित करून शेक स्वरूपात सेवन केलं जातं. 

काय असतो धोका?

(Image Credit : Healthline)

नेचर मेटाबॉलिज्म नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, BCAA भलेही मसल्स बनवण्यात मदत करत असतील, पण याचा व्यक्तीच्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच याने ना केवळ वजन वाढण्याची भीती असते तर अकाली मृत्यूचाही धोकाही अनेक पटींनी वाढतो. संशोधकांना असं आढळलं की, रक्तात जर BCAA चं प्रमाण अधिक वाढलं तर झोपेसाठी मदत करणारे हॅप्पी हार्मोन्स सेरोटोनिनचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे व्यक्तीची झोप पूर्ण होऊ शकत नाही. 

अमिनो अ‍ॅसिडचं बॅलन्स गरजेचं

(Image Credit : Daily Star)

या रिसर्चच्या सहलेखिका सॅमन्था सोलोन म्हणाल्या की, 'या रिसर्चमधून हे दाखवण्याचा प्रयत्न केली की, आपल्या शरीरात अमिनो अ‍ॅसिडचं बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी गरजेचं आहे की, वेगवेगळ्या स्त्रोतांमधून प्रोटीन मिळवावं. जेणेकरून शरीरात अमिनो अ‍ॅसिडचं बॅलन्स योग्य राहील. अशात केवळ प्रोटीन शेकवर अवलंबून राहण्यापेक्षा मांसांहार, अंडी, बीन्स, डाळी आणि नट्सचं सेवन करायला हवं. यातून तुमच्या शरीराची प्रोटीनची गरज भागवली जाऊ शकते. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स