पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफी पिणं ठरू शकतं घातक, वाचून बसेल तुम्हाला धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:36 IST2023-12-20T13:35:53+5:302023-12-20T13:36:43+5:30
अनेकदा लोकांना याचे नुकसान माहीत नसतात. हे कप स्वस्त असतात पण यामुळे अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.

पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफी पिणं ठरू शकतं घातक, वाचून बसेल तुम्हाला धक्का!
Paper Cup Side Effects: हिवाळ्यात चहा आणि कॉफीचं सेवन करणं अनेकांना आवडतं. गरम वाटण्यासाठी लोक घरी आणि बाहेरही यांचं सेवन करतात. अशात अनेकदा बाहेर चहा किंवा कॉफी पिताना ती पेपर कपमध्ये प्यायली जाते. पण अनेकदा लोकांना याचे नुकसान माहीत नसतात. हे कप स्वस्त असतात पण यामुळे अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.
पेपर कप बनवण्याठी प्लास्टिक किंवा मेणाच्या कोटिंगचा वापर केला जातो. ही कोटिंग कपाला मजबूत आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी केली जाते. पण ही कोटिंग घातक केमिकल्सपासून तयार केली जाते. जसे की, बिस्फेनॉल ए (बीपीए), फ्थेलेट आणि पेट्रोलियम रसायन. बीपीए एक घातक केमिकल आहे जे हार्मोन्सला प्रभावित करू शकतं. एका रिसर्चनुसार, पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफी प्यायल्याने बीपीएचा स्तर वाढू शकतो. बीपीएचा स्तर वाढल्यावर अनेक समस्या होऊ शकतात.
बीपीए आणि फ्थेलेटचे नुकसान
बीपीए एक हार्मोन डिसटर्बिंग केमिकल आहे. याने पुरूषांची प्रजनन क्षमता प्रभावित होऊ शकते. त्याशिवाय यामुळे कॅन्सर, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचाही धोका होऊ शकतो. तेच फ्थेलेटही एक हार्मोन डिसटर्बिंग केमिकल आहे. याने मुलांचा विकास प्रभावित होऊ शकतो.
अॅसिडिटीची समस्या
पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफी प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या वाढू शकते. पेपर कपमध्ये गरम चहा किंवा कॉफी प्यायल्याने कपातील पेपर तुटून छोट्या तुकड्यांमध्ये बदलतात. हे तुकडे चहा किंवा कॉफीमध्ये मिक्स होतात. यामुळे अॅसिडिटी होते. त्याशिवाय पेपर कपमुळे संक्रमणाचा धोकाही होतो.
पेपरचे इतर नुकसान
पेपरचे पर्यावरणासाठीही अनेक नुकसान होतात. हे कप लवकर तुटतात आणि ते नष्टही उशीरा होतात. हे कप जाळले तर नुकसानकारक रसायन सोडतात. जे वायु प्रदूषणाचं कारण बनतात.