पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर दुधात टाकून प्या 'ही’ एक गोष्ट, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:32 IST2024-12-20T15:08:31+5:302024-12-20T18:32:01+5:30

Milk and honey for constipation problems: लाइफस्टाईलमध्ये काही बदल करून ही समस्या दूर केली जाऊ शकते. यासाठी एक प्रभावी घरगुती आहे. तो म्हणजे दुधात मध टाकून पिणे.

Drinking milk and honey to get rid of constipation problems | पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर दुधात टाकून प्या 'ही’ एक गोष्ट, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी

पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर दुधात टाकून प्या 'ही’ एक गोष्ट, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी

Milk and honey for constipation problems: आजच्या धावपळीच्या आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना बद्धकोष्ठतेची समस्या होते. पाणी कमी पिणे, चुकीचे पदार्थ खाणे, शारीरिक हालचाल न करणे यामुळे पचन तंत्र बिघडतं. ज्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही. जर तुम्हालाही अनेकदा बद्धकोष्ठतेची समस्या होत असेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. बद्धकोष्ठतेमुळे पोटात गडबड, सूज आणि हलकी  वेदना होते. लाइफस्टाईलमध्ये काही बदल करून ही समस्या दूर केली जाऊ शकते. यासाठी एक प्रभावी घरगुती आहे. तो म्हणजे दुधात मध टाकून पिणे. या उपायाने पोट लगेच साफ होईल. चला जाणून घेऊ याचे फायदे आणि पिण्याची पद्धत...

पोटाला मिळेल आराम

दुधात कॅल्शिअम आणि प्रोटीन भरपूर असतं. जे पचन तंत्राला व्यवस्थित काम करण्यासाठी मदत करतं. दुधाने पोटाच्या मांसपेशींना आराम मिळतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यावर रात्री झोपण्याआधी एक ग्लास दूध प्यावं.

मधाचे फायदे

बद्धकोष्ठता असल्यावर मधाचं सेवन केल्यास पचन तंत्र मजबूत राहतं. मधात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे आतड्या साफ ठेवतात. दुधाने आतड्यांमधील विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होतं.

लॅक्टिक अ‍ॅसिड

लॅक्टिक अ‍ॅसिड बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यास मदत करतं. कारण याने आतड्यांची गति वाढते. याने नॅचरल पद्धतीने पचन तंत्र उत्तेजित होतं. ज्यामुळे मलत्याग करण्यास सहजता येते. लॅक्टिक अ‍ॅसिडने आतड्यांमधील विषारी तत्व बाहेर पडतात. ज्यामुळे बद्धकोष्ठताही दूर होते.

दूध पिण्याची पद्धत

रोज रात्री झोपण्याआधी एक ग्लास गरम दुधात एक चमचा मध टाकून प्यावे. हे प्यायल्याने आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि मलत्याग करण्यास मदत मिळते. सकाळी पोट साफ होण्याची शक्यता जास्त असते. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास पचन तंत्र सुधारतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या हळूहळू कमी होईल. 

Web Title: Drinking milk and honey to get rid of constipation problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.