सकाळी झोपेतून उठल्यावर प्या तांब्याच्या भांड्यातील २ ग्लास पाणी, दूर होतील 'या' ५ समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:46 IST2025-01-20T12:45:48+5:302025-01-20T12:46:23+5:30

Copper Water : कॉपर शरीरातील अनेक आवश्यक कार्यत महत्वाची भूमिका बजावतं. जसे की, एनर्जी प्रोडेक्शन, कनेक्टिव टिश्यू आणि ब्रेन केमिकल मेसेजिंत सिस्टीम.

Drink 2 glasses of water from a copper vesse in the morning, these 5 problems will go away! | सकाळी झोपेतून उठल्यावर प्या तांब्याच्या भांड्यातील २ ग्लास पाणी, दूर होतील 'या' ५ समस्या!

सकाळी झोपेतून उठल्यावर प्या तांब्याच्या भांड्यातील २ ग्लास पाणी, दूर होतील 'या' ५ समस्या!

Copper Water : आपल्या शरीराला फार कमी प्रमाणात योग्य कॉपरची गरज असते, जे कॉपर रिच फूड्सच्या माध्यमातून मिळू शकतं. सोबतच तांब्याच्या भांड्यात स्टोर केलेलं पाणी पिऊनही कॉपर मिळवू शकता. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यानं यातील तत्व मिनरल्समध्ये मिक्स होतं.

कॉपर शरीरातील अनेक आवश्यक कार्यत महत्वाची भूमिका बजावतं. जसे की, एनर्जी प्रोडेक्शन, कनेक्टिव टिश्यू आणि ब्रेन केमिकल मेसेजिंत सिस्टीम. आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. तांब्याच्या भांड्यातील पाण्यानं शरीर डिटॉक्स होतं, इम्यूनिटी मजबूत होते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. आज आम्ही ५ अशा समस्यांबाबत सांगणार आहोत, ज्या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ दूर केल्या जाऊ शकतात.

पोट होईल साफ

रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं पचन तंत्राला खूप फायदा मिळतो. या पाण्यानं पोटातील विषारी तत्व बाहेर निघण्यास मदत मिळते आणि आतड्या साफ होतात. हे पाणी प्यायल्यानं पोट साफ न होण्याची म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच पचनक्रियाही चांगली होते. नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानं अ‍ॅसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

तंत्रिका तंत्र मजबूत होतं

तांब हे एक खास खनिज आहे जे तंत्रिका तंत्रासाठी फायदेशीर असतं. यानं तंत्रिका तंत्राची कार्यप्रणाली सुधारते आणि मानसिक तणाव कमी होतो. सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यानं मेंदू सक्रिय होतो आणि मानसिक थकवा दूर होतो. यानं मेंदुची क्षमता वाढते आणि एकग्रातही वाढते.

त्वचेसंबंधी समस्या होतील दूर

तांब्याच्या भांड्यातील पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. हे पाणी त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर काढतं आणि रक्त शुद्ध करतं. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.  हे पाणी त्वचेची वय वाढण्याची प्रक्रिया स्लो करतं आणि सुरकुत्या रोखतं. तांब्याच्या पाण्यानं पिंपल्स आणि डागही कमी होतात.

वजन कमी होतं

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमितपणे प्या. तांब्यानं शरीरातील चरबी बर्न होण्याची प्रक्रिया वेगानं होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. या पाण्यानं शरीराचं वजन कंट्रोल होतं आणि चरबी कमी होते.

इम्यून सिस्टीम मजबूत होतं

तांबे एका अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात काम करतं आणि शरीराची इम्यूनिटी वाढवतं. हे पाणी शरीराला नुकसानकारक बॅक्टेरिया आणि व्हायरससोबत लढण्याची शक्ती देतं. ज्यामुळे सर्दी, ताप आणि इतर इन्फेक्शनपासून बचाव होतो. तांब्याचं पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं, ज्यामुळे शरीर आतून साफ होतं. अशात शरीराची इम्यूनिटी वाढते.

Web Title: Drink 2 glasses of water from a copper vesse in the morning, these 5 problems will go away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.