वजन कमी करण्यासाठी करू नका कार्बस् ना बाय बाय, उलट करा हेल्थी कार्बसचा आहारात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 05:41 PM2021-07-20T17:41:11+5:302021-07-20T17:41:51+5:30

आपल्या शरीराला कामे करण्यासाठी कार्बस्ची आवश्यकता असते. त्यामुळे अन्नातून कार्बस् म्हणजेच कार्बोहायट्रेड काढून टाकण्याएवजी हेल्दी कार्बस् खाणं फायद्याचं ठरेल.

Don't say goodbye to carbs to lose weight, do the opposite. Include healthy carbs in your diet | वजन कमी करण्यासाठी करू नका कार्बस् ना बाय बाय, उलट करा हेल्थी कार्बसचा आहारात समावेश

वजन कमी करण्यासाठी करू नका कार्बस् ना बाय बाय, उलट करा हेल्थी कार्बसचा आहारात समावेश

Next

वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक डाएटचे पर्याय आले आहेत. या डाएट्समध्ये कार्बस् कमी करायला सांगतात. पण हे योग्य नाही. आपल्या शरीराला कामे करण्यासाठी कार्बची आवश्यकता असते. त्यामुळे अन्नातून कार्बस् म्हणजेच कार्बोहायट्रेड काढून टाकण्याएवजी हेल्दी कार्बस् खाणं फायद्याचं ठरेल.


रताळे
रताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. रताळी अँटीऑक्सिडेंट्सचा समृद्ध स्त्रोत आहेत जे जीवघेण्या आजारांपासून संरक्षण करतात. या व्यतिरिक्त, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात मदत करतात.

डाळी
डाळींमध्ये कार्बस्, प्रथिने आणि फायबर भरपूर असते. आहारात दररोज डाळीचे सेवन केल्यास शरीरात साखरेची पातळी संतूलित राहते. डाळींमध्येही अँटीऑक्सिडंट्स असतात जे वय वाढण्याची लक्षणे कमी करतात आणि रोगांपासून संरक्षण करतात.

डेअरी उत्पादने
डेअरी उत्पादने म्हणजेच दुधापासून बनवले जाणारे पदार्थ. हे अत्यंत पोषक कार्बस्नी समृद्ध असतात. तसेच दुग्धजन्य पदार्थांत लॅक्टोज नावाची एक नैसर्गिक साखर असते. हे स्नायू मजबूत करण्यात आणि ऊर्जा देण्यासही मदत करते.

फळे
टरबूज आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांमध्ये पोषक कार्बस् असतात. त्यामध्ये नैसर्गिक साखरेसह भरपूर खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. आपल्या रोजच्या आहारात फळांचा समावेश करा. त्यामुळे साखरेची तल्लफ कमी करुन वजन कमी करण्यासही मदत होते.

धान्य
आपण आहारात ज्वारी, उकडा तांदूळ, बाजरी इत्यादींचा समावेश करा. या सर्व गोष्टींमध्ये पोषक कार्बस् असतात. ज्यामुळेपोट बर्‍याच वेळ भरलेले राहते. 

Web Title: Don't say goodbye to carbs to lose weight, do the opposite. Include healthy carbs in your diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app