नारळाची मलई टाकून देण्याचा विचारही करू नका, फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 03:32 PM2021-06-22T15:32:43+5:302021-06-22T16:28:30+5:30

नारळाच्या पाण्याप्रमाणेच त्याची मलाई देखील आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला नारळाच्या मलाईच्या फायद्यांविषयी माहिती देणार आहोत.

Don't even think of throwing away coconut cream, you will be amazed at the benefits | नारळाची मलई टाकून देण्याचा विचारही करू नका, फायदे वाचून व्हाल अवाक्

नारळाची मलई टाकून देण्याचा विचारही करू नका, फायदे वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

आरोग्यासाठी नारळपाणी खूप फायदेशीर ठरते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्याबरोबरच नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड देखील ठेवते. नारळाच्या पाण्याप्रमाणेच त्याची मलाई देखील आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला नारळाच्या मलाईच्या फायद्यांविषयी माहिती देणार आहोत.  डाएटिशियन वाणी अग्रवाल यांनी ओन्लीमाय हेल्थ या वेबसाईटला दिलेले हे फायदे जाणून घेतल्यास आपण कधीही नारळाचा उरलेला भाग टाकून देणार नाहीत. 
वजन कमी करण्यात फायदेशीर 
सामान्यत: लोकांना असं वाटतं की नारळाची मलाई खाल्ल्यास वजन वाढतं. परंतु असं नाही, जर आपण हे मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ते शरीरात चरबी साठवण्याऐवजी वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. नारळाच्या मलाईमध्ये असणारे पॉवर-पॅक फॅट आपल्याला बर्‍याच काळासाठी परिपूर्ण ठेवते.
उर्जेने भरपूर 
नारळाच्या मलाईला तुम्ही उर्जेचा पॉवर हाऊस म्हणून शकता. नारळाच्या लगद्यामध्ये असलेली मलाई शरीरात तत्काळ ऊर्जा निर्माण करते.


डायबेटीसमध्ये उपयोगी पडते
डायबेटीस रुग्णांना नारळाची मलई न खाण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे वजन वाढते. मात्र नारळाची मलई डायबेटीसच्या रुग्णांमध्ये इन्शुलिन कंट्रोलमध्ये ठेवते. तसेच इतरही आजार दूर ठेवते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
नारळाच्या यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असतं, जे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतं. तसेच या मलाईमध्ये व्हिटॅमिन ई सोबतच व्हिटॅमिन सी, के आणि ए सुद्धा असतं. हे व्हिटॅमिन्स त्वचा, केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. मलाईमध्ये कॅलरीज, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात.
इरिटेबल बॉवेल सिंड्रोम 
तुम्हाला जर अपचन, पोटदुखी अशा समस्या जाणवत असतील तर ही कदाचित इरिटेबल बॉवेल सिंड्रोमची लक्षणे असू शकतात. यावर नारळाची मलई रामबाण आहे. यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते जे या आजारात शरीराला आराम देते.
 

Web Title: Don't even think of throwing away coconut cream, you will be amazed at the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.