Smartwatch Cause Cancer Risk : स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँड वापरण्याचा हल्ली मोठा ट्रेंड सुरू आहे. ट्रेंडच काय हे एक फॅशन स्टेटस झाले आहेत. फक्त वेळ बघण्यासाठीच नाही तर आपल्या आरोग्यावर नजर ठेवण्यासाठी देखील हे डिव्हाइस कामी पडतात. जसे की, हार्ट रेट, झोप, चालणे, कॅलरी बर्न आणि इतरही तब्येतीसंबंधी माहिती आपल्याला मनगटावर मिळते. भरपूर मोठ्या प्रमाणात लोक या गोष्टींचा वापर करतात. पण अलिकडे एक प्रश्न सुद्धा काही लोकांना पडत होता. तो म्हणजे स्मार्ट वॉच घातल्याने कॅन्सर होऊ शकतो का? यासंबंधी वेगवेगळे रिसर्च नेहमीच समोर येत असतात. अशात खरंच असं काही होतं का ते पाहुयात.
स्मार्टवॉच आणि कॅन्सरचा काही संबंध आहे का?
स्मार्टवॉच आणि फिटनेस बँड हे छोटे इलेक्ट्रॉनिकक डिव्हाइस असतात, जे आपण मनगटावर बांधतो. हे फोनसोबत कनेक्ट होऊन करतात आणि तसेच ब्लूटूथसारख्या वायरलेस सिग्नलचा वापर करतात. हे डिव्हाइस शरीरातील बऱ्याच हालचालींवर लक्ष ठेवून असतात. जसे की, हार्ट रेट, झोपेची क्वालिटी, पावलांची संख्या आणि फिजिकल अॅक्टिविटी. यातून निघाणारा रेडिओ सिग्नल फार कमी पॉवरचा असतो आणि हा non-ionising radiation असतो. म्हणजे हे रेडिएशन आपल्या डीएनए नुकसान करून कॅन्सरचं कारण ठरेल इतकंही घातक नसतं.
काही रिसर्चनुसार, स्मार्टवॉचचा रेडिओ सिग्नल फार कमी असतो. हा मोबाइल फोनपेक्षाही कमी असतो. आतापर्यंत याने कॅन्सर झाल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे केवळ सिग्नल किंवा ब्लूटूथमुळे स्मार्टवॉचला कॅन्सरचं कारण मानलं गेलेलं नाही.
अलिकडेच यासंबंधी एक नवा मु्द्दा समोर आलाय. काही रिसर्चमधून अशी बाब समोर आलीये की, अनेक फिटनेस बँड आणि स्मार्टवॉच स्ट्रॅपमध्ये सिंथेटिक रबरचा वापर केला जातो. ज्यात PFAS नावाचं केमिकल असू शकतं. यातील एक केमिकल PFHxA बाबत चर्चा झाली आहे. ज्याला forever chemicals असंही म्हटलं जातं. कारण हे पर्यावरणात लवकर नष्ट होत नाही.
PFAS आणि PFHxA काय आहे?
PFAS एक मोठा केमिकल समूह आहे जो अनेक प्रॉडक्ट्समध्ये वापरला जातो. जसे की, कपडे, नॉन-स्टिक कोटिंग, पॅकेजिंग आणि रबर प्रॉडक्ट्स. काही रिसर्चमध्ये या केमिकल्सच्या संपर्कात जास्त राहिल्याने आरोग्यासंबंधी धोका निर्माण होऊ शकतो. पण आतापर्यंत हे सिद्ध झालं नाही की, स्मार्टवॉच घातल्याने थेट कॅन्सर होतो.
Web Summary : Smartwatches use low-power radio signals, less potent than phones. No direct cancer link is proven, but some straps contain PFAS chemicals needing further research. Risk is minimal.
Web Summary : स्मार्टवॉच कम शक्ति वाले रेडियो सिग्नल का उपयोग करते हैं, जो फोन से भी कम शक्तिशाली होते हैं। कैंसर का कोई सीधा संबंध नहीं है, लेकिन कुछ स्ट्रैप में पीएफएएस रसायन होते हैं जिन पर शोध की आवश्यकता है। जोखिम कम है।