खरंच गॅसच्या आसेवर चपाती पाचवल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? जाणून घ्या सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:59 IST2024-12-09T11:58:47+5:302024-12-09T11:59:55+5:30
Health Tip : बरेच लोक असा दावा करतात की, थेट गॅसच्या आसेवर चपाती शेकल्याने कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढतो. पण यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊया.

खरंच गॅसच्या आसेवर चपाती पाचवल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? जाणून घ्या सत्य!
Health Tip : काही वर्षांआधी चपाती चुलीवर तव्यावर पाचवली जात होती. कधी कधी थेट चुलीतील आगीवर चपाती पाचवली जात होती. मात्र, आता जास्तीत जास्त घरांमध्ये गॅसचा वापर वाढला आहे. गॅसवर चपाती पाचवणं सोपं झालं आहे. वेळ वाचवण्यासाठी आणि चपाती फुगावी म्हणून आजकाल महिला गॅसच्या आसेवर चपाती पाचवतात.
गॅसच्या आसेवर चपाती लवकर, मुलायम होते आणि चांगली फुगते सुद्धा. पण बरेच लोक असा दावा करतात की, थेट गॅसच्या आसेवर चपाती शेकल्याने कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढतो. अशात प्रसिद्ध डायटिशिअन भावेश गुप्ता यांनी हा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.
भावेश यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एक शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत आहे की, आजार वाढण्याचं एक मोठं कारण गॅसवर पाचवलेली चपाती असते. शिक्षक सांगत आहे की, महिला चपाती लवकर व्हावी म्हणून थेट गॅसच्या आसेवर पाचवतात. गॅसमध्ये एक असं तत्व असतं ज्यामुळे कॅन्सरचा धोका असतो.
LPG पासून धोका नाही
भावेश यांनी WHO चा रेफरन्स देत सांगितलं की, जो LPG गॅस आपण घरात वापरतो तो एक क्लीन फ्यूल आहे. ज्यात कोणत्याही प्रकारचे कॅन्सरचे तत्व नसतात. यातून कोणतंही विषारी तत्व निघत नाही आणि हे WHO ने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.
WHO काय सांगतं?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेशननुसार, घरगुती वायु प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याची सुरक्षा करण्यासाठी स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे. कारण घरांमध्ये अशुद्ध इंधन जळाल्याने निघणाऱ्या धुराच्या संपर्कात आल्याने श्वसनासंबंधी आजारांचा धोका वाढतो. खासकरून कमी उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये हा धोका अधिक असतो.
चुकीची पद्धत घातक
न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, गॅसच्या आसेवर चपाती पाचवल्याने कॅन्सर होण्याचं थेट आणि वैज्ञानिक प्रमाण नाही. मात्र, चपाती चुकीच्या पद्धतीने पाचवली तर आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात.