डॉक्टरांनी सांगितलं कधी आणि कुणी करू नये लिंबू पाण्याचं सेवन, वाचाल तर फायद्यात रहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:54 IST2024-12-11T12:53:24+5:302024-12-11T12:54:06+5:30
lemon water : उपाशीपोटी लिंबू पाणी पिणं ही एक हेल्दी सवय आहे. पण सगळ्यांसाठी ती फायदेशीर ठरेलच असं नाही.

डॉक्टरांनी सांगितलं कधी आणि कुणी करू नये लिंबू पाण्याचं सेवन, वाचाल तर फायद्यात रहाल!
Lemon Water : भरपूर लोक चांगल्या आरोग्यासाठी लिंबू पाण्याचं सेवन करतात. लिंबू पाण्याने शरीराला एनर्जी तर मिळतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. लिंबामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. याच्या नियमित सेवनाने वजन कमी करण्यासही मदत मिळते. इतकंच नाही तर याच्या सेवनाने त्वचा आणि केसही निरोगी राहतात.
लिंबू पाणी कधी पिऊ नये?
सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिण्याची सवय चांगली मानली जात नाही. कारण यामुळे लिव्हर खराब होऊ शकतं. डॉक्टर सलीम जैदी यांच्यानुसार उपाशीपोटी लिंबू पाणी पिणं ही एक हेल्दी सवय आहे. पण सगळ्यांसाठी ती फायदेशीर ठरेलच असं नाही.
जर कुणाला अॅसिडिटी, लिव्हरची समस्या किंवा दातांमध्ये झिणझिण्याची समस्या असेल तर अशावेळा उपाशीपोटी लिंबू पाणी पिऊ नये. कारण यातील सिट्रिक अॅसिडमुळे आरोग्य बिघडू शकतं. याने दातांचं वरचं कवचही हळूहळू डॅमेज होतं.
लिव्हर होऊ शकतं खराब
डॉक्टरांनी सांगितलं की, लिंबातील अॅसिड लिव्हरचं फंक्शन वाढवतं, जे एका निरोगी व्यक्तीसाठी ठीक आहे. मात्र, जर लिव्हर आधीच कमजोर असेल किंवा लिव्हरची काही समस्या असेल तर लिंबू पाण्यामुळे यावर आणखी दबाव पडू लागतो. ज्यामुळे डायजेशन आणि लिव्हर डिटॉक्स सिस्टीम दोन्ही कमजोर होतात.
जर तुम्हाला अॅसिडिटी किंवा दातांमध्ये झिणझिण्या येण्याची समस्या असेल तर लिंबू पाण्याऐवजी तुम्ही मनुक्याचं पाणी पिऊ शकता. रात्रभर मनुके एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उपाशीपोटी हे पाणी सेवन करा. याने लिव्हर डिटॉक्सही होईल आणि अॅसिडिटीही होणार नाही.