शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

पोट नेहमीच फुगलेलं किंवा भरलेलं राहतं का? या तीन उपायांनी दूर होईल गॅसची समस्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 12:02 IST

Bloating : ब्लोटिंग काय आहे? ही एक अशी समस्या आहे ज्यात तुमचं पोट नेहमीच भरलेलं जाणवतं आणि पोटात गॅस असल्याचंही जाणवतं.  महिलांमध्ये ही समस्या जास्त बघायला मिळते.

Bloating : तुमचं पोट नेहमीच भरलेलं किंवा फुगलेलं राहतं का? पोट फुगलेलं राहत असल्याने तुम्ही पोटभर जेवण करू शकत नाही? थोडसंच खाल्लं की, तुमचं पोट भरतं का? जर या प्रश्नांचं उत्तर हो असेल तर याचा अर्थ तुम्हाला ब्लोटिंगच्या समस्या आहे.  अर्थातच ही समस्या इतकी गंभीर नाही, पण जास्त काळ ही समस्या राहिली तर शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते आणि तुम्ही कमजोरीचे शिकार होऊ शकता.  असं मानलं जातं की,  ही छोटीशी समस्या इरिटेबल बाउल सिंड्रोमसारख्या गंभीर स्थितीचं कारण बनू शकते.

ब्लोटिंग काय आहे? ही एक अशी समस्या आहे ज्यात तुमचं पोट नेहमीच भरलेलं जाणवतं आणि पोटात गॅस असल्याचंही जाणवतं.  महिलांमध्ये ही समस्या जास्त बघायला मिळते. असं मानलं जातं की, बद्धकोष्ठतेचं हे सर्वात मोठं कारण आहे. तसेच पोटासंबंधी अनेक समस्याही याचं कारण आहेत. जर तुम्हीही या समस्येने पीडित आहात, तर तुम्ही आहारात बदल करावा लागेल. अमेरिकन डॉक्टर Dr. Josh Axe यांनी याबाबत काही सल्ले दिले आहेत. त्यांनी सांगितलेल्या पदार्थांचा सेवन केलं तर ही समस्या दूर होऊ शकते.

पाण्याने भरपूर फळं-भाज्या

डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी असलेला फळं आणि भाज्यांचं सेवन केलं पाहिजे. ज्यात काकडी, खरबूज, जांभळं यांचा समावेश आहे. 

प्रोबायोटिक असलेले पदार्थ

डॉक्टरांनी सांगितलं की, दह्यासारखे प्रोबायोटिक खाद्य पदार्थ खराब बॅक्टेरियाला मारतात ज्याने पचनासंबंधी समस्या दूर होतात.

जडीबुटीही फायदेशीर

त्यांनी सांगितलं की, जडीबुटीनेही पोट फुगण्याची समस्या दूर होऊ शकते. आलं, बडीशेप यांनीही पोट सहजपणे शांत होतं. 

पोट फुगण्यावर उपचार

जर ही समस्या तुम्हाला खूप दिवसांपासून असेल, तर याचं मुख्य कारण बद्धकोष्ठता असू शकतं. हेच कारण आहे की, आधी बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवावी. बऱ्याच काळापासून असलेली बद्धकोष्ठतेची समस्या पाइल्सचं रूप घेऊ शकते. जर बद्धकोष्ठता हलकी असेल तर फायबरयुक्त आहार, पाणी आणि व्यायामाने मदत मिळते. पण याने फायदा होईलच असं नाही. जुन्या बद्धकोष्ठतेवर उपचार घेण्यासाठी आयबीएस किंवा गॅस्ट्रोपेरिसिससाठी मेडिकल उपचारांची गरज असते. त्यामुळे या समस्येबाबत डॉक्टरांशी बोला.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य