शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

पॅरासिटामाॅल खाताय? आधी डॉक्टरांशी बोला, आरोग्यावर दुष्परिणाम होण्याचा धोका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 12:58 IST

नुकताच एडिनबर्ग विद्यापीठातील तज्ज्ञांनी उच्च रक्तदाबाचा इतिहास असलेल्या ११० रुग्णांवर हा अभ्यास केला आहे. चार दिवसांत पॅरासिटामॉलवर ठेवलेल्या गटामध्ये रक्तदाब लक्षणीयरीत्या वाढला होता, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकची शक्यता २० टक्क्यांनी वाढली होती.

मुंबई : थोडासाही थकवा आला तर अंगदुखीसाठी आणि थकवा दूर करण्यासाठी पॅरासिटामॉल आणि पेनकिलर गोळ्या खातो. पण याचे दुष्परिणाम माहित आहेत का? डोकेदुखी, ताप, अंगदुखी, मळमळ, उलटी यासारख्या लहान मोठ्या आजारांवर आपण डॉक्टरांचा सल्ला न घेता पॅरासिटामॉल आणि पेनकिलर घेतो. मात्र, याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.नुकताच एडिनबर्ग विद्यापीठातील तज्ज्ञांनी उच्च रक्तदाबाचा इतिहास असलेल्या ११० रुग्णांवर हा अभ्यास केला आहे. चार दिवसांत पॅरासिटामॉलवर ठेवलेल्या गटामध्ये रक्तदाब लक्षणीयरीत्या वाढला होता, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकची शक्यता २० टक्क्यांनी वाढली होती. तीनपैकी एक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे, तरी ब्रिटनमधील १० पैकी एका व्यक्तीला तीव्र वेदनांसाठी दररोज पॅरासिटामॉल लिहून दिले जाते. रुग्णांना पॅरासिटामॉल लिहून देण्यापूर्वी काळजी घ्यावी, अशी माहिती फिजिशियन डॉ. विकास बनसोडे यांनी दिली आहे. आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल याचं मिश्रण करून गोळी बनवली जाते. बहुतेक लोक या औषधांचे सेवन करतात. परंतु या औषधाचे जास्त सेवन केल्याने फुप्फुसाची समस्या उद्भवू शकते आणि दम्याचा त्रास देखील होऊ शकतो. याव्यतिरिक्त हाय बीपी, प्रोस्टेट आणि थायरॉईडसारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

पॅरासिटामाॅलचा डोस किती असावापॅरासिटामॉलचा डोस व्यक्तीच्या वजनानुसार ठरतो. ५० किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीला ५०० मिलिग्रॅम औषधांचा डोस दिवसातून ३ वेळा दिला जातो. याचाच अर्थ दिवसभरात केवळ १५०० ते २००० मिलिग्रॅमचा डोस पुरेसा असतो. हा डोस किती दिवस घ्यायचा हे डॉक्टर रुग्णाची परिस्थिती पाहून ठरवितात. 

सततच्या सेवनाने मेंदूवर परिणामवेदनाशामक गोळी घेण्यापूर्वी वेदना नेमकी का होत आहे, आणि ते कारण कमी करता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. दुखणे हे नैसर्गिक असून ते लक्षण आहे. वेदनाशामक गोळी हा केवळ तात्पुरता उपाय आहे. सतत गोळ्या घेतल्याने त्याचा परिणाम मूत्रपिंड आणि मेंदूवरही होतो.- डॉ. नूतन सावजी, मानसोपचारतज्ज्ञ

- ११० रुग्णांवर अभ्यास.- २० टक्क्यांनी वाढली हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकची शक्यता.- १० पैकी एका व्यक्तीला ब्रिटनमधील पॅरासिटामॉल दिली जाते.- वैद्यकीय सल्ल्याविना औषधांचे सेवन केल्यास गंभीर दुष्परिणाम शक्यता डॉ. रवींद्र सोनटक्के यांनी व्यक्त केली. 

औषध साक्षरता महत्त्वाचीडोस नियमित, रोज एकाच वेळी घेतल्यास औषधाची रक्तातील पातळी कायम राहून अपेक्षित सुपरिणाम होतो. म्हणून औषधांचे वेळापत्रक पाळणे महत्त्वाचे व डोस शक्यतो विसरू नये. आधीचा डोस विसरला म्हणून पुढच्या डोसच्या वेळी डबल डोस घेऊ नये. अँटिबायॉटिक्सचा कोर्स पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अतिरंजित जाहिरातींना भुलून वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वत:वर औषधांचा प्रयोग करू नये.- डॉ. रामकृष्ण जाधव 

टॅग्स :Healthआरोग्यtabletटॅबलेटmedicineऔषधं