आंघोळ करताना तुम्हीही 'या' चुका करता का? गंभीर परिणाम टाळण्यासाठी जाणून घ्या योग्य पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 16:45 IST2021-06-22T16:44:21+5:302021-06-22T16:45:05+5:30
भारतातील बदलत्या ऋतुमानाप्रमाणे आपली आंघोळ करण्याची पद्धतही बदलते. थंडी आणि पावसाळ्यात अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. त्यामुळे आपल्याला काही काळापुरते रिलॅक्स वाटतेही पण उलट यामुळे उलट शरीरातील उर्जा कमी होते.

आंघोळ करताना तुम्हीही 'या' चुका करता का? गंभीर परिणाम टाळण्यासाठी जाणून घ्या योग्य पद्धत
सकाळीच सकाळी आंघोळ करताना तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय आहे का? जर असल्यास ही सवय तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही. भारतातील बदलत्या ऋतुमानाप्रमाणे आपली आंघोळ करण्याची पद्धतही बदलते. थंडी आणि पावसाळ्यात अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. त्यामुळे आपल्याला काही काळापुरते रिलॅक्स वाटतेही पण उलट यामुळे उलट शरीरातील उर्जा कमी होते. जाणून घेऊया चूकीच्या पद्धतीने आंघोळ करायचे धोके...
गरम पाण्याने आंघोळ केल्यावर काय होते?
द सन या मासिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार जेव्हा तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करून सामान्य तापमानात येता. त्यावेळी तुमच्या शरीराचे तापमानही खाली येते. यामुळे तुम्हाला जास्त रिलॅक्स वाटून झोप आल्यासारखी वाटते.
आंघोळ करण्याची योग्य पद्धत
तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करण्याआधी ३० सेकंद अंगावर थंड पाणी होता त्यानंतरच गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे तुमच्या त्वचेच्या खाली असलेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व तुम्ही उर्जावान होता.
तणाव कमी होतो
अशापद्धतीने आंघोळ केल्याने तणाव कमी होतो. तसेच तुमची रोगप्रतिकार शक्तीही वाढते. यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि तुम्ही जास्त एनर्जिटीक होता.