कांदा खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? नसेल तर आता जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 09:56 AM2024-06-15T09:56:24+5:302024-06-15T09:56:53+5:30

Onion Eating Benefits : कांदा थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात याचं सेवन फायदेशीर ठरतं. यात पाणी भरपूर असतं. याचं सेवन केलं तर शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही.

Do you know the right to eat onion? know the benefits | कांदा खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? नसेल तर आता जाणून घ्या...

कांदा खाण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? नसेल तर आता जाणून घ्या...

Onion Eating Benefits : कांदा एक अशी भाजी आहे ज्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. कांद्याशिवाय अनेक पदार्थ चांगलेच लागत नाहीत. कांद्याच्या सेवनाने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक भरपूर कांदे खातात. कारण कांदा थंड असतो. उष्माघातापासून बचावासाठी कांदा खूप मदत करतो.

न्यूट्रिशनिस्ट आणि डाइटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, उष्णता जास्त वाढल्याने उष्माघाताचा धोका असतो सोबतच हृदयासंबंधी समस्याही होऊ शकतात. उष्णतेमुळे मानसिक आरोग्यही बिघडतं. चिडचिड वाढते आणि थकवा जाणवतो. त्यामुळे या समस्यांपासून बचाव करण्यासाठी आहारात कांद्याचा समावेश केला पाहिजे. पण कांदा खाताना जास्तीत जास्त लोक चूक करतात. कांदा खाण्याची योग्य पद्धत काय आहे आणि त्याचे फायदे आज जाणून घेऊया.

कांद्याचे फायदे

कांदा थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात याचं सेवन फायदेशीर ठरतं. यात पाणी भरपूर असतं. याचं सेवन केलं तर शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही. सोबतच यात सोडिअम आणि पोटॅशिअम असतं जे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.

उन्हाळ्यात खाज आणि घामोळ्यांपासून बचाव

कांद्यामधील क्वेरसेटिन आणि सल्फरमुळे शरीर थंड राहतं. क्वेरसेटिन एक असं तत्व आहे जे हिस्टमाइन नावाचं रसायनही कमी करतं जे उष्णतेमुळे एलर्जी, रॅशेज आणि कीटक चावल्याने होणारी खाज दूर करतं

ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं

उन्हाळ्यात शरीराला आपलं तापमान सामान्य ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. याने हृदय, फुप्फुसं आणि किडनीवर जास्त दबाव पडतो. कांद्यातील एलील सल्फाइड्स रक्तवाहिन्या लवचिक आणि पसरट ठेवण्यास मदत करतं ज्यामुळे ब्लड प्रेशर कम होतं आणि रक्त पुरवठाही सुरळीत राहतो.

गॅस आणि अपचन होत नाही

कांद्यामुळे पचनासाठी आवश्यक एंजाइम अॅक्टिव होतात ज्यामुळे पोटात गॅस आणि अपचन अशा समस्या होत नाही. कांद्यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्स भरपूर असतात. याने आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. 

कांदा खाण्याची योग्य पद्धत

सॅलडमध्ये कच्चा कांदा 

कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्ससहीत अनेक पोषक तत्व असतात. जे शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. कच्च्या कांद्यामध्ये लिंबाचा रस, पुदीन्याची पाने, मीठ आणि काळे मिरे पावडर टाकून खाऊ शकता.

दही- कांदा

दह्याच्या रायत्यामध्ये म्हणजे कोशिंबिरमध्ये कच्चा कांदा टाकून खाऊ शकता. रायता थंडा असतो जो शरीराचं तापमान कमी करण्यास मदत करतो. बारीक कापलेला कांदा दह्यात टाका, त्यात चिमुटभर मीठ, जिरे पावडर आणि कोथिंबीर टाका. 

कांद्याचा रस

कांद्याचा रस उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करतो. काही कांद्याचा रस काढा आणि त्यात तेवढाचा लिंबाचा रस टाका. टेस्टसाठी यात चवीनुसार थोडं मीठ टाका. 

Web Title: Do you know the right to eat onion? know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.