रोज डाळ-भात खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 12:48 PM2018-04-21T12:48:58+5:302018-04-21T12:48:58+5:30

इतर पदार्थांप्रमाणे डाळ-भात खाण्याचेही अनेक फायदे आहेत. डाळीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि कोलेस्ट्रोल असतं.

Do you know the benefits of eating dal and rice every day? | रोज डाळ-भात खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत?

रोज डाळ-भात खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत?

googlenewsNext

भारतात जास्तीत जास्त लोक रोज डाळ-भात खाणे पसंत करतात. प्रत्येक घरात डाळ-भात तयार केला जातो. काही लोक डाळ-भात आवडीने खातात तर काही यामुळे वजन वाढण्याचं कारण देतात. पण इतर पदार्थांप्रमाणे डाळ-भात खाण्याचेही अनेक फायदे आहेत. डाळीत मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि कोलेस्ट्रोल मिळतात आणि भातात मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असतात. चला जाणून घेऊया डाळ-भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे..

1) पचायला सोपे

डाळ-भातामुळे तुमच्या पचनक्रियेला आराम मिळतो. मसूर डाळ किंवा मूग डाळ पचायला हलकी असते. भातही पचनाला हलका असतो. त्यात कार्बोहाइड्रेट मोठ्या प्रमाणात असतात. याने शरीराला एनर्जी मिळते. 

2) प्रोटीनचा खजिना

जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी डाळ प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहे. डाळ आणि भातात वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असतात. त्यामुळे या दोन्ही एकत्र खाल्ल्याने प्रोटीन अधिक प्रमाणात मिळतात.

3) फायबर

डाळ आणि भातात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. यामुळे पचनतंत्र निंयत्रित आणि सुरळीत राहतं. फायबरमुळे डायबेटिझसारख्या रोगांपासून सुटका मिळू शकते आणि तुमचं ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहतं.

4) वजन कंट्रोल करता येतं

अनेक डाएट एक्सपर्ट असे मानतात की, तुम्ही जर वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असाल तर तुम्ही दिवसातून दोनदा भात खायला हवा. सोबतच भाज्याही खाव्यात. 

5) बनवायला सोपं

डाळ-भात तयार करण्याला आणि खायलाही सोपा आहे. हे तयार करण्यासाठी तुम्ही फारच एक्सपर्ट असणे गरजेचे नाही.

Web Title: Do you know the benefits of eating dal and rice every day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.