तुम्हाला कच्चा तांदुळ खाण्याची सवय आहे का? सामोरे जाल गंभीर परिणामांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 17:37 IST2021-06-15T17:36:09+5:302021-06-15T17:37:03+5:30
काही लोकांना कच्चा तांदूळ खाण्याचीही सवय असते. कदाचित तुम्हाला देखील ही सवय असेल तर तुम्हाला ही सवय महागाच पडू शकते.

तुम्हाला कच्चा तांदुळ खाण्याची सवय आहे का? सामोरे जाल गंभीर परिणामांना
किनारपट्टी भागात भात हे मुख्य अन्न आहे. येथील लोक चपातीच्या तुलनेत बहुतेक लोकं भात खाणं पसंत करतात. तांदुळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन-डी, कॅल्शियम, फायबर, लोह, थायमिन आणि राइबोफ्लेविनचे भरपूर प्रमाणात असतं. भातमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वं तसंच खनिजं आढळतात. जी शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. मात्र लक्षात घ्या तांदूळ हा शिजवलेलाच असला पाहिजे. तांदुळ शिजवूनच त्याचे सेवन केले पाहिजे तरच तांदूळ फायदेशीर ठरतो. मात्र, काही लोकांना कच्चा तांदूळ खाण्याचीही सवय असते. कदाचित तुम्हाला देखील ही सवय असेल तर तुम्हाला ही सवय महागाच पडू शकते.
कच्च्या तांदळाचं नियमित सेवन केल्याने फूड पॉयझनिंग देखील होऊ शकतं. यामध्ये बॅसिलस सिरस नावाचा बॅक्टेरिया असतो. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होण्याची समस्या उद्भवू शकते.
शरीरातील उर्जा कमी होते
जे लोक कच्च्या तांदळाचं सेवन करतात त्यांच्या शरीरात सतत आळस भरलेला असतो. कच्च्या तांदळाचे सेवन केल्याने थकवा येतो, ज्यामुळे शरीरातील उर्जा कमी होते.
चयापचय क्रियेत अडथळा
कच्च्या भातमध्ये लेक्टीन हे प्रोटीन आढळतं. हे खरंतर एक कीटकनाशक म्हणून काम करतं. त्यामुळे कच्च्या तांदळाचं सेवन टाळलं पाहिजे. यामुळे पचनासंबधित समस्या उद्भवू शकतात.
किडनी स्टोन
ज्या व्यक्ती कच्च्या तांदळाचं सेवन करतात त्यांना किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास असतो त्यांनीही कच्चा तांदूळ खाऊ नये.