गोड खाण्याची सवय कमी करण्यासाठी हे करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 12:20 IST2016-09-16T14:33:20+5:302016-09-17T12:20:38+5:30
गोड खाण्यामुळे दातच दुखत नाहीतर, वजनसुद्धा वाढते. तसेच सुस्ती येऊन, संतूलन सुद्धा बिघडते

गोड खाण्याची सवय कमी करण्यासाठी हे करा
पौष्टीक आहार : शरीर निरोगी ठेवण्यासाठी गोड कमी खाणे आवश्यक आहे. त्याकरिता गोडावरील लक्ष कमी करण्यासाठी विटामिन बी, विटामिन सी यांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मन शांत राहते. त्याकरिता पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे.
दूर ठेवण्याचा प्रयत्न : एकदमच कोणतीच सवय सुटत नसते. हळूहळू स्वत:ला गोड पदार्थापासून दूर करावे. खूपच गोड खाण्याची इच्छा झालीच तर अशा वेळेला फळे व कच्चा भाजीपाला खावा.
तणावमुक्त राहा : तणाव असल्याने काहीही सेवन केले जाते. त्याकरिता स्वत: ला तणावमुक्त ठेवणे आवश्यक आहे.
व्यायाम गरजेचा : गोड खाण्याची ही सवय कमी करावयाची असेल तर आपल्या दिनचर्यात व्यायाम करणे हे खूप गरजेचे आहे.