कानात गेलेलं पाणी काढण्यासाठी डोक्याला झटका दिल्यास ब्रेन डॅमेजचा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 11:07 IST2019-11-25T11:02:41+5:302019-11-25T11:07:12+5:30
आंघोळ करताना किंवा स्वीमिंग करताना अनेकांच्या कानात पाणी जातं आणि कानातील हे पाणी काढण्यासाठी अनेकजण डोक्याला झटका देतात किंवा कानात बोट घालून जोराने हलवतात.

कानात गेलेलं पाणी काढण्यासाठी डोक्याला झटका दिल्यास ब्रेन डॅमेजचा धोका!
(Image Credit : healthline.com)
आंघोळ करताना किंवा स्वीमिंग करताना अनेकांच्या कानात पाणी जातं आणि कानातील हे पाणी काढण्यासाठी अनेकजण डोक्याला झटका देतात किंवा कानात बोट घालून जोराने हलवतात. अर्थातच पाणी कानात गेलं तर याने कानात इन्फेक्शनही होऊ शकतं किंवा कान डॅमेजही होऊ शकतो. पण डोक्याला झटका देऊन कानातील पाणी काढणं तुमच्यासाठी फार जास्त घातक ठरू शकतं. हा दावा आमचा नाही तर एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.
लहान मुलांना होतं अधिक नुकसान
अमेरिकेतील कॉर्नेल यूनिव्हर्सिटी आणि व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी संयुक्त रूपाने एक नवीन रिसर्च केलाय. ज्यात ही बाब समोर आली की, कानात गेलेलं पाणी काढण्यासाठी डोक्याला जोरात झटका दिला तर लहान मुलांच्या मेंदूला नुकसान होऊ शकतं. या रिसर्चचे निष्कर्ष अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या डिविजन ऑफ फ्लूअड डायनॅमिक्सच्या ७२व्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आलाय.
अल्कोहोल किंवा व्हिनेगरचा वापर
अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितले की, कानात गेलेलं पाणी लहान मुलांच्या मेंदूसाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्यांनी थ्री डी कान आणि ग्लास ट्यूबवर शोध केला. या शोधानुसार, वयस्कांमध्ये कानाच्या नलिकेचा व्यास मोठा असतो. कानाच्या खालच्या भागावर अल्कोहोल किंवा व्हिनेगरच्या थेंबांचा वापर करू शकता. याने कानाच्या खालच्या भागातील तणाव कमी होतो आणि पाणी कानातून बाहेर येऊ शकतं.