कारल्याची भाजी खाल्ल्यावर हे पदार्थ खाणं पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 16:03 IST2023-06-10T16:02:33+5:302023-06-10T16:03:37+5:30
Foods To Avoid After Having Bitter Gourd : कारलं हे डायबिटीसच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर असतं. तसेच कारल्याचं सेवन केल्याने पोटासंबंधी अनेक समस्या लगेच दूर होतात.

कारल्याची भाजी खाल्ल्यावर हे पदार्थ खाणं पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध!
Foods To Avoid After Having Bitter Gourd : कारल्याची भाजी म्हटलं की, अनेक लोक नाकं मुरडतात. कडू चव लागल्याने अनेक लोक ही भाजी खाणं टाळतात. पण ज्यांना आवडते ते लोक आवडीने ही भाजी खातात. अनेकांना माहीत असेल की, कारल्याच्या भाजीचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. कारलं हे डायबिटीसच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर असतं. तसेच कारल्याचं सेवन केल्याने पोटासंबंधी अनेक समस्या लगेच दूर होतात.
मात्र, कारलं खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हे अनेकांना माहीत नसतं. कारलं खाल्ल्यावर काही पदार्थ खाल्ले तर तुम्हाला समस्या होऊ शकतात. चला जाणून घेऊ कारलं खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये...
दूध - कारल्याचं सेवन केल्यानंतर तुम्ही दुधाचं सेवन चुकूनही करू नका. असं केलं तर तुम्हाला पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारले खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता, पोटात वेदना आणि जळजळ अशा समस्या होता. जर तुम्हाला आधीच पोटासंबंधी समस्या असेल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
मूळा - कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर मूळा किंवा मूळ्यापासून तयार कोणत्याही पदार्थाचं सेवन करू नये. असं केल्याने तुम्हाला शरीरासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याचं कारण मूळा आणि कारल्याचे गुण वेगवेगळे असतात. ज्यामुळे तुम्हाला अॅसिडीटी आणि घशात कफ अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे कारलं खाल्ल्यानंतर मूळा अजिबात खाऊ नये.
दही - अनेक लोकांना जेवताना दही खाण्याची सवय असते. पण जर तुम्ही कारल्याच्या भाजीसोबत दह्याचं सेवन केलं तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर दह्याचं सेवन केलं तर तुम्ही त्वचेसंबंधी समस्येचा सामना करावा लागू शकतो.