'या' ६ गोष्टी फ्रिजमधून काढून लगेच खाणं पडेल महागात; गंभीर आजारांचा वाढतोय धोका 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 05:23 PM2020-12-24T17:23:49+5:302020-12-24T17:39:13+5:30

Health Tips in Marathi : ज्या लोकांना फ्रिजमधून पाणी किंवा कोणतीही वस्तू काढून लगेच खाण्याची सवय असते. नकळतपणे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

Do not eat these foods in winter just after taking out of fridge | 'या' ६ गोष्टी फ्रिजमधून काढून लगेच खाणं पडेल महागात; गंभीर आजारांचा वाढतोय धोका 

'या' ६ गोष्टी फ्रिजमधून काढून लगेच खाणं पडेल महागात; गंभीर आजारांचा वाढतोय धोका 

Next

हिवाळ्यात आपल्या राहणीमानावर तसंच खाण्यापिण्याच्या सवयींत बदल घडून येत असतो. पण काही लोक असे असतात. जे आपल्या खाण्यपिण्याच्या सवयींमध्ये बदल करत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. ज्या लोकांना फ्रिजमधून पाणी किंवा कोणतीही वस्तू काढून लगेच खाण्याची सवय असते. नकळतपणे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.  याबाबत डॉ, अनार सिंह आयुर्वेदिक कॉलेज आणि रुग्णालयातील प्राध्यापक आणि विभागाध्यक्ष राखी मेहरा यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

ज्युस

तुम्हाला कल्पना असेलच अनेकांना फक्त गरमीच्या वातावरणात नाही तर हिवाळ्यात सुद्धा ज्यूस प्यायला फार आवडतं. पण वाढत्या आजारांचा धोका लक्षात घेता हिवाळ्यात कोल्डड्रिंक्सचे सेवन टाळायला हवे. खासकरून जेव्हा तुम्ही फ्रिज उघडता तेव्हा लगेच फ्रिजमधून काढून पाण्याचे किंवा ज्युसचे सेवन करू नका. यामुळे सर्दी, खोकला, ताप  अशा समस्या उद्भवू शकतात. पचनक्रिया मंदावते त्यामुळे गॅस, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.

भाज्या

धावपळीच्या दैनंदिन जीवनात असं पाहायला मिळतं की, रात्रीचं  जेवण दुपारी आणि दुपारचं जेवण रात्री खाल्लं जातं. अशावेळी उरलेलं अन्न अनेक घरांमध्ये फ्रिजमध्ये ठेवतात. त्यानंतर बाहेर काढून पुन्हा या पदार्थांचे सेवन केले जाते. ठराविक वेळेनंतर या अन्नावर बॅक्टेरिया बसतात. हिवाळ्यात बॅक्टेरियांमुळे होणारं संक्रमण वाढण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो ताजं अन्न खा. 

कापलेली फळं

अनेकांना सफचंद, केळी, पेरू किंवा इतर फळं कापून फ्रिजमध्ये ठेवायची सवय असते.  एक्सपर्ट्सच्यामते कधीही कापलेली फळं फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण त्यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो.परिणामी संक्रमण पसरतं. जेव्हा फ्रिजमधून काढून तुम्ही कोणत्याही पदार्थांचे सेवन करता तेव्हा बॅक्टेरिया जमा झाल्यास असे अन्न खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता.

आईस्क्रिम

लोक बर्‍याचदा फ्रीजमधून काढून लगेचच आईस्क्रीम खातात. अशा गोष्टी हिवाळ्यामध्ये नेहमीच दूर ठेवल्या पाहिजेत किंवा आपण नेहमीच सामान्य तापमानासह या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याच वेळी, ज्या लोकांना आधीपासूनच संसर्ग, फ्लू आहे त्यांनी अशा गोष्टींचा आहारात समावेश करू नये.  त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखीची समस्या उद्भवते.

COVAXIN व्हायरसपासून किती काळ सुरक्षा देणार? 'मेड इन इंडिया' लसीबाबत महत्त्वाची माहिती समोर

चपातीचं पीठ

डॉ राखी मेहरा स्पष्ट करतात की बर्‍याच लोकांना अशी सवय असते की ते रात्री चपातीचं पाठी मळून ठेवतात. पण जेव्हा चपाती बनवण्यासाठी पीठ बाहेर काढले जाते तेव्हा  सरळ लाटण्यास सुरवात करतात. परंतु जेव्हा जेव्हा आपल्याला फ्रिजमधलं पीठ वापरावं लागतं तेव्हा आपण ते थोडा वेळ बाहेर ठेवणं आणि नंतर ते वापरणे गरजेचे आहे. तज्ज्ञ म्हणतात की पीठ ताबडतोब रेफ्रिजरेटरमधून काढून कोणताही पदार्थ बनवू नये.

चिंताजनक! कोरोनाच्या संकटात आता फंगल इन्फेक्शनचा वाढतोय धोका; जाणून घ्या लक्षणं

दूध

सर्व लोक फ्रिजमध्ये दूध ठेवतात, परंतु जेव्हा ऑफिसला किंवा पुढची काम करायला उशीर होतो तेव्हा काही लोक फ्रिजमधून दूध काढतात आणि ते तसंच पितात असे केल्याने आपल्या शरीराच्या तापमानावर परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण कोणत्याही वेळी दूध पीत असाल तरी ते जास्त थंड असू नये.

Web Title: Do not eat these foods in winter just after taking out of fridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.